शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
4
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
5
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
6
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
7
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
8
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
9
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
10
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
11
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
12
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
13
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
14
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
15
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
16
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
17
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
18
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
19
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
20
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा

जिल्हा परिषद सभापतींचे दूरध्वनी बंद

By admin | Updated: May 31, 2014 02:05 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापती कार्यालयांमधील दूरध्वनीची बिले भरली न गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून सर्व दूरध्वनी बंद आहेत़ त्यामुळे सभापतींना विविध कामांसाठी संपर्क साधणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे़

नाशिक : जिल्हा परिषदेच्या विविध विषय समितींच्या सभापती कार्यालयांमधील दूरध्वनीची बिले भरली न गेल्याने गेल्या १५ दिवसांपासून सर्व दूरध्वनी बंद आहेत़ त्यामुळे सभापतींना विविध कामांसाठी संपर्क साधणे अडचणीचे ठरत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे़ जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींच्या दालनात शासनाच्या वतीने दूरध्वनी सेवा पुरवली जाते़ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करताना या पदाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या सर्व शासकीय सुविधा बंद करण्यात आल्या होत्या़ आचारसंहितेच्या काळात सभापतीही कार्यालयात येत नव्हते़ त्यामुळे त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीचे बिल भरण्यात आले नव्हते़ आचारसंहिता संपल्यानंतर सभापतींना पुन्हा सार्‍या सुविधा देण्यात आल्या; परंतु दूरध्वनीचे बिल न भरल्याने दूरध्वनी मात्र बंदच आहेत़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष वगळता अर्थ व बांधकाम सभापती, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण व समाजकल्याण सभापती यांच्या कार्यालयांतील दूरध्वनी सेवा बंद असल्याने त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ जिल्हा परिषद अंतर्गत तसेच बाहेरील व्यक्तींशी, अधिकार्‍यांशी संपर्क करताना अडचणी येत आहेत़ या सर्व कामांसाठी सभापतींना स्वत:च्या मोबाइलवर अवलंबून राहावे लागत असल्याने सर्व सभापती कायम मोबाइलवरच बिझी असल्याचे दिसत आहे़ दरम्यान, त्यांच्या कार्यालयातील दूरध्वनीची बिले भरण्यासाठी तातडीने हालचाली सुरू असल्याचे समजते़