शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होणार टेलिमेडिसीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:37 IST

नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने ऐनवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि औषधांचा सल्ला घेणे सोपे ठरत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सुमारे चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटरनेट जोडणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आठ केंद्रांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले असून, विशेष म्हणजे त्यातील सिन्नर तालुक्यातील एका केंद्रात टेलिमेडिसीनचा शुभारंभही करण्यात आला आहे.

संजय पाठक ।नाशिक : प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची वानवा असल्याने ऐनवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार आणि औषधांचा सल्ला घेणे सोपे ठरत असून, त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सुमारे चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये इंटरनेट जोडणी होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आठ केंद्रांच्या जोडणीचे काम पूर्ण झाले असून, विशेष म्हणजे त्यातील सिन्नर तालुक्यातील एका केंद्रात टेलिमेडिसीनचा शुभारंभही करण्यात आला आहे.ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आधार आहे. खासगी डॉक्टरांची अपुरी अवस्था असल्याने प्राथमिक केंद्रावर अवलंबून राहावे लागते. मात्र अशाप्रकारे रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती हा विषय वादाचा असतो. अनेकदा डॉक्टर गायब असतात किंवा उपलब्ध असलेले डॉक्टर एखाद्या विकाराबाबत तज्ज्ञ नसतात अशावेळी टेलिमेडिसीनसारख्या साधनांचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यासाठी उत्तम इंटरनेट कनेक्टीव्हीटी आवश्यक असल्याने सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने बीएसएनएलमार्फत आॅप्टिकल फायबरने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सुमारे चाळीस केंद्रांच्या जोडणीचे काम करण्यात येणार असून, त्यापैकी आठ केंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील केंद्रात तर टेलिमेडिसीन योजनेचा शुभारंभ अलीकडेच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.तंत्रज्ञान पूरक लाभप्राथमिक आरोग्य केंद्रातील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे केवळ टेलिमेडिसीन नव्हे तर व्हिडीओ कॉन्फरसिंग, प्रशासकीय नियंत्रण यासह अन्य अनेक प्रकारचे लाभ घेता येऊ शकतात. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम होण्यास तंत्रज्ञान पूरक ठरणार आहे.