शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दस्तऐवजांचा काटेकोर तपासणी करण्याचे तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 00:28 IST

देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देसर्व तलाठी व मंडल अधिकारी यांना सक्त सूचना दिल्या आहेत.

देवळा : आलेल्या दस्तऐवजांचा काटेकोरपणे तपासणी करून खात्री पटल्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. काही शंका आल्यास दुय्यम निबंधक कार्यालयाशी पत्रव्यवहार करून दस्तऐवज विषयी खात्री करून घ्यावी आदी सूचना शेजुळ यांनी दिल्या आहेत.बनावट दस्तावेज तयार करून जमीन खरेदी करण्याच्या घटनेनंतर महसूल विभाग खडबडून जागा झाला आहे. मंडल अधिकारी व तलाठी यांनी आलेल्या दस्तऐवजांचा काळजीपूर्वक तपासणी करून नंतरच नोंद करावी अशी सक्त सूचना तहसीलदार दत्तात्रय शेजुळ यांनी देवळा तालुक्यातील मंडल अधिकारी व तलाठी यांना दिल्या आहेत.देवळा तालुक्यात एकाच क्रमांकाचा मुद्रांक दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे देऊन खरेदी-विक्री झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. यात जबाबदार असलेले दुय्यम निबंधक कार्यालयाबरोबरच, मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडे देखील ह्या प्रकरणी संशयाची सुई वळली, यामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला असून तहसीलदार शेजुळ यांनी सर्व तलाठी व मंडल अधिकारी यांना सक्त सूचना दिल्या आहेत._ देवळा तालुक्यात देवळा, लोहोणेर, उमराणा, व खर्डा अशी चार महसूल मंडळे असून सोळा तलाठी सजे आहेत. मेशी येथे तलाठी सजा असून तो उमराणा महसूल मंडळाच्या अखत्यारीत येतो._ बनावट मुद्रांकाच्या आधारे खोटे दस्तावेज तयार करून संगनमताने मेशी शिवारातील शेतजमिनीची (गट नं. ४००/१) परस्पर विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार भास्कर धर्मा निकम यांनी दिल्यानंतर पोलिसांनी काही व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणी लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार