शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणवेढे-दारणा सांगवी रस्त्याची तहसीलदारांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

हिंगणवेढे हद्दीतील हिंगणवेढे ते दारणा सांगवी शिवरस्त्याची तहसीलदार अनिल दौंडे, तलाठी जी. एच. भुसारे यांनी पाहणी करून पंचनामा ...

हिंगणवेढे हद्दीतील हिंगणवेढे ते दारणा सांगवी शिवरस्त्याची तहसीलदार अनिल दौंडे, तलाठी जी. एच. भुसारे यांनी पाहणी करून पंचनामा केला. हा रस्ता अंदाजे १०० वर्षांपासून वहिवाटीत असून, लगतच्या शेतकऱ्यांनी मोजणी केल्याने व त्यांच्या हद्दीत आल्याने त्यांंनी तो काढून टाकला होता; परंतु त्यामुळे पलीकडील शेतकऱ्यांचा येण्या- जाण्याचा मार्ग बंद होऊन, त्यांंना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी महसूल विभागाला पत्र देऊन रस्ता खुला करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी यासाठी पाठपुरावा केला. त्यावर तहसीलदार यांनी पंचनामा करून, लगतच्या शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

पाहणीदरम्यान सरपंच राजू धात्रक, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ कृष्णा नागरे, सोमनाथ नागरे, खंडू धात्रक, पोलीसपाटील दयाजी शिंदे, सुनील वाघ, भाऊसाहेब आव्हाड, सोमनाथ धात्रक, संजय पगारे, सुभाष धात्रक व लगतचे शेतकरी उपस्थित होते.

फोटो- हिंगणवेढे-दारणा सांगवी वहिवाट रस्त्याची स्थळभेट पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा करताना तहसीलदार अनिल दौंडे. समवेत तलाठी जी. एच. भुसारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, सरपंच राजू धात्रक, पोलीसपाटील दयाजी शिंदे आदींसह ग्रामस्थ.

180721\18nsk_40_18072021_13.jpg

हिंगणवेढे-दारणासांगवी वहिवाट रस्त्याची स्थळभेट पाहणी करुन शेतकऱ्यांशी चर्चा करतांना तहसिलदार अनिल दौंडे, तलाठी जी.एच.भुसारे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, सरपंच राजु धात्रक, पोलिस पाटील दयाजी शिंदे व ग्रामस्थ