शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठ परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२० - २१च्‍या द्वितीय सत्रासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू ...

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२० - २१च्‍या द्वितीय सत्रासाठी परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, गेल्‍या दोन - तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यासाठी संकेतस्‍थळाला भेट देत असल्‍याने सर्व्हर ठप्प होत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना तांत्रिक अडचणी उद्‌भवत असून, ‘सर्व्हर अनॲव्‍हेलेबल’ अशी सूचना संकेतस्‍थळावर दाखविली जात असल्‍याने विद्यार्थ्यांना मनस्‍ताप सहन करावा लागत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या काही परीक्षांसाठी अर्ज करण्याची मुदत रविवारी (दि. २०) संपुष्टात येणार असल्याने अर्ज भरण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांची एकाच वेळी लगबग सुरू झाल्याने अशा प्रकारे तांत्रिक अडचणींचा सामना कराला लागत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे, तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या अर्जांसाठी शुक्रवार (दि. २५)पर्यंत मुदत आहे. पुणे विद्यापीठाने जुलै, ऑगस्‍ट महिन्‍यात शैक्षणिक वर्षाच्‍या द्वितीय सत्राची परीक्षा घेणार असल्‍याचे जाहीर केले असून, या परीक्षांना प्रविष्ठ होण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरायचा आहे. यासंदर्भात विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्‍या नोंदणीकृत क्रमांकावर लिंक पाठविण्यात आली असून, अर्जात तांत्रिक चुका टाळण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांकडून सायबर कॅफेतून अर्ज भरण्यास प्राधान्‍य दिले जात आहे. मात्र, गेल्‍या दोन - तीन दिवसांपासून संकेतस्‍थळात अनेक तांत्रिक अडचणी येत असल्‍याने विद्यार्थ्यांना अर्जच भरता येत नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. संकेतस्‍थळ दुरुस्‍त होण्याच्‍या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांना सायबर कॅफेमध्ये तासन्‌तास बसावे लागत असून, गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचीही भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सायबर कॅफेवर चकरा माराव्या लागत आहेत. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांसह त्‍यांच्‍या पालकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहेत.