शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याने आणले उत्पादकांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:09 IST

मागील वर्षाचा कटू अनुभव विसरून यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो असा बियाणांचा दर असतानाही मोठ्या ...

मागील वर्षाचा कटू अनुभव विसरून यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी चार ते पाच हजार रुपये प्रतिकिलो असा बियाणांचा दर असतानाही मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीमुळे बऱ्याच भागात बियाणांचा तुटवडा जाणवला. शेजारील तालुक्यातून बियाणे आणून शेतकऱ्यांनी कांद्याचा जुगार खेळला. अनेकांची बियाणांमध्ये फसवणूकही झाली. अशा परिस्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी कांदा पीक जोमात आणण्याचा प्रयत्न केला. वाढती मजुरी व खते, औषधे यांच्या किमतीत झालेली वाढ, ही कांदा पिकाचे उत्पादन खर्च वाढविणारी ठरली. यंदा खरीप हंगामापासूनच हवामानही फारसे अनुकूल नव्हते. डिसेंबरनंतर उन्हाळ कांद्याच्या लागवडीला सुरुवात झाली. या महिन्यात लागवडीचे प्रमाण नगण्य होते. जानेवारी अखेरपर्यंत कांदा लागवड सुरू होती. फेब्रुवारी महिन्यात अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला साडेचार हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला. हे दर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत टिकून होते; मात्र अचानक दरात घसरण होण्यास सुरुवात होऊन हजार ते बाराशे रुपये क्विंटलपर्यंत खाली आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वसूल होतो की नाही, अशीच शंका निर्माण व्हायला लागली. महावितरणने ऐन टप्प्यात वीजबिल वसुली सुरू करून शेतकऱ्यांना झटका दिला. त्यातच अवकाळी पाऊस, गारपिटीने तडाखा दिला. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागला. आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असून, लॉकडाऊन करायची वेळ आल्यास शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.