शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटनांनी ठोकले शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:16 IST

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी व तक्रारीसंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक अडचणी व तक्रारीसंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ, नाशिक जिल्हा टीडीएफ, तसेच नाशिक जिल्हा शिक्षक परिषदेच्या वतीने तीन दिवसांपूर्वीच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याबाबत इशारा दिलेला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यातील पदाधिकारी शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले असता शिक्षणाधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हत्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क केला असता, त्या बाहेरगावी असल्याचे समजले. त्यामुळे अधीक्षक सुधीर पगार व उपशिक्षणाधिकारी अनिल शहरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक कार्यालयाबद्दल तक्रारी मांडल्या. यावेळी दि. १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंतची सर्व प्रकारचे मेडिकल बिले काढले असे वेतनपथक अधीक्षक उदय देवरे यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागील अनेक बिले पुरावे म्हणून सादर केली. ती बिले निघाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. लॉकडाऊनच्या काळातही काही संस्थाचालक व मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत येण्याबाबत सक्ती करतात, तसेच कारणे दाखवा नोटिसा देतात. याबाबत संबंधित शाळांची नावे कळविल्यास त्या मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी अधीक्षक पगार व उपशिक्षणाधिकारी शहारे यानी विनंती केल्याने पदाधिकाऱ्यांनी कुलूप काढले व पुढील काळात वेतन पथक अधीक्षक यांच्यासमवेत सविस्तर बैठक घेऊन सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष साहेबराव कुटे जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम, मालेगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष अनिल अहिरे, सचिन देशमुख, शिक्षक परिषदेचे दत्ता पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, प्रदीप सिंग पाटील, त्र्यंबक मार्तंड, मनोहर देसाई, देशमुख, जयेश सावंत, अशोक मार्तंड, सचिन शेवाळे, आशिष पवार, राजेंद्र शेळके, डी. आर. पठाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोट...

मेडिकल बिल, पगार वेळेवर होत नसल्याबाबत वेतन पथक अधीक्षक देवरे यांनी लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावेत. लॉकडाऊन काळात शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देणे योग्य नाही.

- सचिन देशमुख मालेगाव

फोटो - २० मालेगाव १

नाशिक येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप लावताना साहेबराव कुटे, आर. डी. निकम, सचिन देशमुख, दत्ता पाटील, नीलेश ठाकूर, जयेश सावंत, आदी उपस्थित होते.

===Photopath===

200521\20nsk_24_20052021_13.jpg

===Caption===

नाशिक येथील शिक्षणाधिकारी कार्यालयाला कुलूप लावतांना साहेबराव कुटे, आर डी निकम, सचिन देशमुख, दत्ता पाटील, निलेश ठाकूर, जयेश सावंत आदी.