शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

शिक्षिकेचा धारधार शस्त्राने खून

By admin | Updated: July 5, 2014 00:20 IST

शिक्षिकेचा धारधार शस्त्राने खून

लासलगाव : येथून जवळच असलेल्या निमगाव वाकडा येथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका अर्चना शांताराम लकारे (वय २३, मूळ रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांची धारधार शस्त्राने हत्त्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेतील मारेकरी मुकेश साबळे याने वार करत स्वत:लाही जखमी केल्याने एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वळदगाव शाळेत कोपरगाव येथील अर्चना शांताराम लकारे या प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरीस होत्या. त्या निमगाव वाकडा येथील रेणुकानगरातील भाईदास पंडित शिसव यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होत्या. शुक्रवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घरमालक सुनंदा भाईदास शिसव यांना ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी ही माहिती गणेश वडनेरे यांना दिली. ते घटनास्थळी दाखल झाले असता अर्चना लकारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. मारेकऱ्याने दरवाजा आतून बंद केला असल्याने गणेश वडनेरे यांनी दाराला बाहेरून कडी लावत घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील, दीपक आवारे, कॉ. सूरज मेढे, बी.आर. बिन्नर हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता घरात अर्चना लकारे या मृत, तर मुकेश गोपाळ साबळे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. या ठिकाणीच धारदार सुरा व कोयता पडलेला होता. मुकेश साबळे (वय २५, रा. कसबा पेठ, पुणे) याला तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालायात हलवण्यात आले. पोलिसांना घरात सापडलेल्या बॅगमध्ये मुकेश साबळे याचे शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, परीक्षेचे हॉल तिकीट तसेच पॅनकार्ड आढळले. तसेच एका कोऱ्या कागदावर पेनने गणपतीचा फोटो काढून त्यामध्ये अर्चना-मुकेश असे नाव लिहून त्याखाली ‘अर्चना मुकेश बाप्पा आमची जोडी अशीच राहू दे’ अशा मजकुराचा कागद आढळून आला. त्यामुळे प्रेम प्रकरणातून ही हत्त्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत गणेश विजय वडनेरे याच्या फिर्यादीवरून मुकेश साबळे याच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२, ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपअधीक्षक नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत. (वार्ताहर)