वणी : पदार्र्थ तयार करण्याच्या कामामुळे लक्ष्मीदर्शनवणी : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सण साजरा करण्यासाठी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्वयंपाक कलेने करण्याची संकल्पना मागे पडली असून, आचाऱ्यांमार्फत असे पदार्थ तयार करवून घेण्याचा फंडा सुरू झाल्याने आचाऱ्यांची दिवाळी लक्ष्मीदर्शनाच्या माध्यमातून बरकत आणणारी ठरली आहे.दैनंदिन कामांचा ताण याबरोबर मुलांची जबाबदारी शिक्षण, महत्त्वाच्या कामांना हजेरी, नाते-गोते, सगेसोयरे यांचे भेटीगाठी, कार्यक्रमांना उपस्थिती यातून वेळात वेळ काढून दिवाळी सण मोकळेपणाने पूर्ण वेळ देत आनंदाने ताणविरहित साजरा करता यावा या मनोभूमिकेतून पदार्थांची थेट खरेदीच्या निर्णयास अग्रक्र म देण्यात येतो आहे. त्यात असे पदार्थ पॅकिंग स्वरूपात परिचिताना देणे सोयीचे होते तसेच आचाऱ्याकडून खरेदी केलेले तसेच बनवुन घेतलेले पदार्थ चविष्ट असतात. तुलनात्मकरीत्या थोडा पैसा जास्त खर्च होतो मात्र वेळेचा अपव्यय होत नाही तसेच काहीशी जबाबदारी कमी होते तसेच दिवाळी सण हा वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने जास्त वेळ सण साजरा करण्याचा कल असल्याने आचाऱ्यांच्या स्टॉलवर गर्दी वाढू लागल्याने त्यांची दिवाळी बरकतीत साजरी होते आहे. (वार्ताहर)
आचाऱ्यांची दिवाळी
By admin | Updated: November 11, 2015 22:07 IST