शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

जनगणना कार्यशाळेवर शिक्षक संघाचा बहिष्कार

By admin | Updated: October 11, 2015 22:19 IST

जनगणना कार्यशाळेवर शिक्षक संघाचा बहिष्कार

सिन्नर : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण व बीएलओ कामकाज प्राथमिक शिक्षकांना न देण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तहसील व पंचायत समिती कार्यालयात आयोजित जनगणना कार्यशाळेवर प्राथमिक शिक्षक संघाने बहिष्कार टाकला आहे. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियम २००९च्या कलम २७नुसार प्राथमिक शिक्षकांना लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, दशवार्षिक जनगणना व नैसर्गिक आपत्ती निवारण कार्य या तीन कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नये, असे स्पष्ट निर्देश असतानादेखील सिन्नर गटातील १५७ प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण व १५० प्राथमिक शिक्षकांना मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याकामी महिनाभरासाठी प्रगणक व बीएलओ म्हणून आदेश देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षक संघाने म्हटले आहे. पंचायत समिती व तहसील कार्यालयात आयोजित लोकसंख्या अद्ययावतीकरण व बीएलओ कार्यशाळेवर प्राथमिक शिक्षक संघाने टाकला असून, ही कामे प्राथमिक शिक्षकांना न देण्याची मागणी तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, तालुकाध्यक्ष विलास ढोबळे, मिलिंद गांगुर्डे, दत्तात्रय वरंदळ, नवनाथ आढाव, बबन आव्हाड, ज्ञानेश्वर देसले, अशोक साळवे, सोमनाथ कराड, सुरेश उगले, भारत शिरोळे आदिंसह प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)