शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघटना : येवल्यात आयडीबीआय बॅँकेची शाखा नसल्याने शिक्षकांची गैरसोय

By admin | Updated: June 21, 2017 00:34 IST

बँकेची शाखा सुरू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : शिक्षकांचे पगार आयडीबीआय बँकेत होणार असल्याचा सुखावणारा निर्णय शासनाने घेतला असला तरी, आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार, असा प्रश्न येवला तालुका शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. आयडीबीआय बँकेने येवल्यात तत्काळ शाखा सुरू करावी, अशी मागणी केली आहे. शिक्षकांचे गेल्या पाच महिन्यांपासून पगार नाही. शासनाने उशिरा का होईना निर्णय घेतला. बुधवारी मुख्याध्यापक व शाळा यांचे संयुक्त खाते बँकेमार्फत काढण्याचे काम नाशिक येथे होणार आहे. सध्या सर्वत्र स्थानिक बँका असतानादेखील ग्राहकांना पैसे काढताना हेळसांड होत आहे. येवला शहरातील सर्व एटीएम बंद आहेत. जिल्हा बँकेत पैसे अडकले आहेत. तेदेखील काढणे जिकिरीचे झाले आहे. एटीएममध्ये खडखडाट असल्याने शिक्षक पैसे कसे काढतील? असा प्रश्न आहे. येवला तालुक्यात एकही शाखा नाही. तत्परतेने बँकेने येवल्यात शाखा उघडावी अशी मागणी राज्य शिक्षक महामंडळ प्रतिनिधी सविता साळुंके, तालुका अध्यक्ष दत्तकुमार उटावळे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे. थेट बँकेला संघटनेने पत्र दिले आहे.स्टेट, महाराष्ट्र, बडोदा, देना, इंडिया आदींसह एचडीएफसी, अ‍ॅक्सिस या बँकांच्या शाखा प्रत्येक तालुक्यात असताना त्यांच्याकडे पगाराची जबाबदारी न देता ज्या बँकेच्या मर्यादित शाखा आहेत त्या बँकेला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येवल्यासह लगतच्या तालुक्यात या बँकेच्या शाखा नसताना शिक्षकांचे पगार आयडीबीआय बँक करणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून उपाशी असलेल्या शिक्षकांनी विरोध करण्याची भूमिका घेतली नाही. शकले पडलेल्या आणि गटबाजीने पोखरलेल्या शिक्षक संघटनांनी श्रेयवादाच्या लढाईत विरोध करणे पसंद केले नाही; मात्र प्रत्यक्षात कार्यवाही कशी होते याकडे शिक्षकांचे लक्ष आहे. एकही शाखा नसताना फक्त एटीएमवरून व्यवहार करीत शिक्षकांना आयडीबीआय बँकेने अनेक सवलतींचा पाऊस पडणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आगीतून उठून फुफाट्यात पडायला नका,े अशी चर्चा शिक्षकांत सुरू आहे.