शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांमुळे विश्वाच्या अवकाशात भरारीचे बळ :ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 01:25 IST

शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ विभागाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

ठळक मुद्देपरराष्टÑ मंत्रालयापर्यंतचा प्रवास उलगडला

नाशिक : शाळेच्या शिक्षकांनी आम्हाला पंख अन् स्वप्न दिले. त्यामुळेच जगाच्या अवकाशात भरारी मारण्याचे बळ मिळाले. घरची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ चांगले शिक्षक आणि चांगले संस्थाचालक मिळाले म्हणून मी परराष्ट्र सेवेत येऊ शकलो, असे प्रतिपादन परराष्टÑ विभागाचे माजी सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.रावसाहेब थोरात सभागृहात सिनर्जी फाउंडेशनतर्फे झालेल्या ‘परराष्ट्र मंत्रालयातील अनुभवविश्व’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. एम. एस. गोसावी, सिनर्जी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप नाटकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, सचिव सुदीप अनावकर, सुनंदा गोसावी, सुनीता जायभावे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. एम. एस. गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त तर अ‍ॅड. जायभावे यांची महाराष्ट्र बार कौन्सिलवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. मुळे यांनी, लहानपणापासून मला प्रत्येक गोष्टीचे कुतूहल वाटत असल्याने भविष्यात खूप फायदा झाल्याचे सांगितले. यूपीएससी पास झाल्यानंतर पुण्यात उपजिल्हाधिकारी झालो, पण जग बघायची उत्सुकता होती. जगातील वेगवेगळ्या भूमीवर आपले पाय लागावेत. तेथील संस्कृती, निसर्ग यांचा अनुभव घ्यावा, असे सारखे वाटत होते. जीवनाविषयीच्या या औत्सुक्यातूनच मी विदेश सेवेत आलो आणि जगाच्या सर्व खंडांमध्ये काम करण्याचा समृद्ध अनुभव घेता आला, असेही त्यांनी नमूद केले.माझा प्रवास हा अतिशय खडतर होता. कोल्हापूरमधील माझ्या शाळेचा पहिला वर्धापनदिन होता तेव्हा त्याला शरद काळे नावाचे आयएएस अधिकारी आले होते. त्यावेळी त्यांना मिळालेला मानपान पाहून मला स्वप्न पडले की आपणही असेच अधिकारी व्हावे. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी १९ आॅगस्ट १९८३ चा दिवस उजाडावा लागला. त्या दिवशी मी गेट नंबर दोन, साउथ ब्लॉक या परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश केला. तो दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. विदेश सेवेत काम करता आल्याने मला खऱ्या अर्थाने समृद्ध होता आले. या सेवेत आल्यामुळे जात, धर्म, भाषा, राज्य, प्रांत असे अभिमान आपोआप गळून पडले. खºया अर्थाने भारतीयत्वाचा अनुभव मिळत गेला. परराष्ट्र सेवेत असल्यामुळे जगाच्या सर्व सहा खंडांमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे डॉ. मुळे यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक