शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराची आज सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:38 IST

नाशिक : गेल्या महिन्यापासून वाजत-गाजत असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार असून, त्यानंतर मात्र उमेदवार व त्यांच्या समर्थकांना फक्त मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेता येणार आहेत. दरम्यान, मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याचे पाहून प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविण्यासाठी ...

नाशिक : गेल्या महिन्यापासून वाजत-गाजत असलेल्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि. २३) सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार असून, त्यानंतर मात्र उमेदवार व त्यांच्या समर्थकांना फक्त मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेता येणार आहेत. दरम्यान, मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याचे पाहून प्रत्येक उमेदवाराकडून मतदारांना विविध प्रकारचे आमिष दाखविण्यासाठी मेळावे, बैठका व भोजनावळीचे आयोजन करण्यात आले आहे.  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी, प्रामुख्याने संदीप बेडसे, किशोर दराडे, भाऊसाहेब कचरे, प्रतापदादा सोनवणे, शालिग्राम भिरूड यांच्यातच चुरस लागली आहे.  त्यासाठी पक्षीय व संघटनात्मक पातळीवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून प्रचार केला जात असून, त्यासाठी मेळावे, बैठका, व्यक्तिगत भेटीगाठींवर जोर देण्यात आला. विशेष करून शिक्षक लोकशाही आघाडीत फूट पडून तीन उमेदवार रिंगणात असल्याने व प्रत्येकानेच संघटनेचा आपल्याला पांिंठबा असल्याचे जाहीर केल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी तिन्ही उमेदवारांना आपली भूमिका पटवून सांगतानाच प्रतिस्पर्ध्यांच्या उखाळ्या-पाखाळ्याही निघू लागल्याने या निवडणुकीचा प्रचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला आहे. काही उमेदवारांनी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी भेटवस्तू तसेच भोजनावळीचे आयोजन केल्यामुळे गुरुजनही चांगभलं करून घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला जाहीर प्रचार मतदानाच्या ४८ तास अगोदर म्हणजेच शनिवारी सायंकाळी ५ वाजता संपुष्टात येणार असून, त्यानंतर मात्र जाहीर प्रचार केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरणार आहे. निवडणूक यंत्रणेने तशी सूचना सर्वच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक