शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्काराचे वितरण ढकलले पुढे

By admin | Updated: September 2, 2016 22:53 IST

गणेश चतुर्थीचे कारण : आदर्श शिक्षकांची नावे ‘गुलदस्त्यात’

नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे दि. ५ सप्टेंबर रोजी होणारे पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. गणपतीनंतर हे पुरस्कार वितरण होण्याची शक्यता आहे.दरम्यान, जिल्हा परिषदेच्या वतीने विभागीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांच्या प्रस्तावास आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली असून, आदर्श शिक्षकांची नावे मात्र प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागाने ‘बंद पाकिटाचे’ कारण देत गुलदस्त्यात ठेवण्यात धन्यता मानल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी जिल्ह्णातून १५ तालुक्यांतून १५ आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. गुरुवारी (दि. १) शासकीय कन्या शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंभळे, शिक्षण सभापती किरण थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी उर्मिला धनगर, शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य सरोज जगताप आदि उपस्थित होते. जिल्ह्णातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण २८ प्रस्ताव आले होते. त्यातील १५ प्रस्तावांना अंतिम करण्यात येऊन ते पुरस्कार मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावांना विभागीय आयुक्त कार्यालयाने मान्यता दिली आहे. या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी काही तालुक्यांतून एकेकच प्रस्ताव आल्याने त्यांनाच अंतिम करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर आली. आता पुरस्कार वितरण पुढे ढकलण्यात आल्याने निवड होऊनही शिक्षकांना ‘आदर्श’ पुरस्काराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)