शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कॉर्पोरेट शाळांना शिक्षक संघटनांचा विरोध फटका : शासननिर्णय मागे घेण्याची मुख्याध्यापक संघ, टीडीएफची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 22:54 IST

सिन्नर : राज्य शासनाने कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे;

ठळक मुद्देउद्योजकांचे सामाईक उत्तरदायित्वभरमसाठ फी उकळी जाते

सिन्नर : राज्य शासनाने कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे; मात्र शिक्षक संघटनांसह अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शविला असून, नवीन शाळा सुरू करण्याऐवजी आहेत त्याच शाळा सक्षम करण्यासाठी कॉर्पोरेटच्या सीएसआर (उद्योजकांचे सामाईक उत्तरदायित्व) फंडाचा वापर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.कॉर्पोरेट कंपन्यांना नवीन शाळा सुरू करण्याबाबत सेल्फ फायनान्स विधेयकात सुधारणा घडवून आणल्याने त्याचा फटका मुंबईसह राज्यातील अन्य अनुदानित शाळांना बसणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली. शासनाने याबाबत पुनर्विचार करून सीएसआरचा वापर करून आहेत त्या शाळांना मदत करण्याची गरज असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. सेल्फ फायनान्सच्या शेकडो शाळा राज्यात सुरू असून, आता या सुधारणा विधेयकामुळे त्यात अजून भर पडणार असून त्याचा परिणाम इतर शाळांवर होण्याची भीतीही देशमुख यांनी व्यक्त केली. सध्या फायनान्स शाळांमधून पालकांकडून भरमसाठ फी उकळी जाते. मात्र कार्यरत शिक्षकांना नियमाप्रमाणे वेतन व भत्ते दिले जात नाहीत. नोकरीवर गदा येईल म्हणून शिक्षक हे सारे सहन करीत असतो. या परिस्थितीत कार्पोरेट शाळांची आणखी भर घातल्यास त्याचा फटका इतर शाळांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी अनेक शैक्षणिक संस्था सीएसआर धोरणाबाबत अनभिज्ञ असून, शासनाने नवीन शाळांचे दरवाजे उघडण्यापेक्षा सीएसआरच्या माध्यमिक खासगी अनुदानित, विना अनुदानित व स्थानिक स्वराज्यसंस्थाच्या शाळांना मदत करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. यासंदर्भात येत्या शनिवारी (दि.३०) दुपारी २ वाजेला जिल्हा मुख्याध्यापक संघ व टीडीएफच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून शिक्षण उपसंचालकाना निवेदन देणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी एस. के. सावंत, एस. बी. देशमुख, एस. बी. सिरसाठ, सुरेश शेलार, गुफरान अन्सारी, माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, परवेज शेख, शुभलक्ष्मी कुलकर्णी उपस्थित होते.