शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकाऱ्याच्या विरोधात शिक्षक संघटनेचे उपोषण

By admin | Updated: March 20, 2017 21:00 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना अरेरावीची वागणूक मिळत असून आरटीईचे प्रमाणपत्र देण्यासाठी पैशाची मागणी होत आहे.

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात येणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांना अरेरावीची वागणूक मिळत असून आरटीईचे प्रमाणपत्र देण्यासाठी पैशाची मागणी होत आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध देयकांच्या फाईली (नस्ती) काढण्यासाठीही देवाण-घेवाण होत असल्याचा आरोप करीत या विरोधात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात एक ठराविकच कर्मचारी कामकाज पाहत असून, २ मे २०१२ नंतर नियुक्त करण्यात आलेल्या व अनेक वर्षापूर्वी मान्यता दिलेल्या ३९ लोकांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु जे लोक ‘भेटले’, त्यांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले. मात्र जे भेटले नाही, त्यांना सुनावणीसाठी बोलविण्यात आले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातही दोन कर्मचाऱ्यांचीच दादागिरी चालत असून २० टक्के अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षकांकडून ठराविक रक्कम घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील संबंधित आरोपांची व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची यावेळी उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष फिरोज बादशाह, जिल्हा टी.डी.एफ.चे अध्यक्ष आर. डी. निकम, विलास पाटील, नईम शाईन, रईस अहमद आदिंसह प्रमुख पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले होते.