शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

शिक्षक आमदार निवडणूक निकालाची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 01:37 IST

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असलेली मते याची खातर जमा करण्यात आली. त्यासाठी २० टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर एक मतपेटी अशाप्रकारे एका फेरीत २० मतपेट्यांतील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला.

ठळक मुद्देसमर्थकांची गर्र्दीमतमोजणी प्रकिया पुढे वेगाने सुरू

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये सुरुवात करण्यात आली. प्रारंभी मतदान केंद्रनिहाय मतपेट्या मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या, मतदान केंद्रनिहाय झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत असलेली मते याची खातर जमा करण्यात आली. त्यासाठी २० टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर एक मतपेटी अशाप्रकारे एका फेरीत २० मतपेट्यांतील मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राजाराम माने, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.दुपारी १२ वाजेपर्यंत मतपेट्यातील मतपत्रिकेची खात्री करीत असताना, मोजलेल्या मतपत्रिका एका हौदात टाकून एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकी २५ याप्रमाणे मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात येऊन, त्यातून वैध, अवैध व संशयित मतपत्रिकांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण ४७ हजार ९७८ मते वैध ठरली. एकूण वैध मतदानाच्या निम्मे व अधिकचे एक अशाप्रकारे विजयी होण्यासाठी उमेदवाराला पहिल्या फेरीत २३ हजार ९९० मतांचा कोटा ठरवून देण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. सर्व मतपत्रिकेचे सरमिसळ केल्यानंतर वैध, अवैध मतांचे वर्गीकरण करण्यास दुपारी १२ वाजता सुरुवात झाली. प्रत्येक टेबलावर एक हजार अशाप्रकारे २० हजार मतांचे वर्गीकरण करण्यासाठी तब्बल तीन तास लागले तर दुपारी ३ वाजता पहिली फेरी पूर्ण झाल्यावर मतमोजणी अधिकारी, कर्मचाºयांची जेवणाची सुटी झाली व पुन्हा ४ वाजता २० हजार मतपत्रिकेचे वाटप टेबलावर करण्यात आले. त्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला. यादरम्यान मतमोजणी टेबलावर नेमलेल्या मतदान प्रतिनिधींनी उमेदवाराची आकडेमोड केल्यामुळे, काही उमेदवारांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला.समर्थकांची गर्र्दीअतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीच्या मतमोजणीविषयी मतदार व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असल्याने सकाळी ११ वाजेनंतर निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. मतमोजणी केद्रांतदेखील सकाळी ७ वाजे पासून उमेदवार व त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी हजर झाले होते. परंतु मतमोजणीच्या किचकट पद्धतीमुळे काही तासांतच उमेदवार व प्रतिनिधींचा उत्साह कमी होत गेला, तर दुसरीकडे मतमोजणी अधिकारी व कर्मचाºयांनी मतमोजणी प्रकिया पुढे वेगाने सुरू केली.