शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
2
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
3
जैसलमेर इथं नागरी वस्तीत सापडला जिवंत बॉम्ब; पाकिस्तानी ड्रोनचा मलाबाही जप्त
4
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले
5
“भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकने व्हिक्टिम कार्ड खेळू नये”; अमेरिकेने सुनावले
6
Operation Sindoor Live Updates: देशविरोधी शक्तींचं कुठलेही षडयंत्र यशस्वी होता कामा नये, RSS चं आवाहन
7
पाकिस्तानला आणखी एक धक्का! BSF ने जैशच्या ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला; सांबामधून घुसखोरीच्या प्रयत्नात होते
8
'ऑपरेशन सिंदूर'वरील प्रत्येक अपडेट देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बहिणीचं आहे बॉलिवूड कनेक्शन, जाणून घ्या याबद्दल
9
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
10
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
11
पहलगाम हल्ल्यानंतर या दिग्गज कंपनीचे ₹१९००० कोटी बुडाले, चालवते देशातील नंबर १ कंपनी
12
"देशात परिस्थिती काय अन् हा बावळट...", किंग कोहलीच्या भावाने राहुल वैद्यला सुनावलं
13
हाय अलर्ट! चंदीगड-अंबालामध्ये पुन्हा वाजले सायरन, नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना
14
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
15
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
16
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
17
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
18
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
19
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
20
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक विकास आघाडीचे धरणे सोमवारी हुतात्मा स्मारकात बैठक

By admin | Updated: December 7, 2014 01:24 IST

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक विकास आघाडीचे धरणे सोमवारी हुतात्मा स्मारकात बैठक

नाशिक : शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित १४ प्रकारच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.८) हुतात्मा स्मारकात बैठक होणार असून, सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडीचे नेते प्रकाश सोनवणे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करावे, अतिरिक्त ठरविण्यात आलेल्या ५० हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संच मान्यतेनुसार तत्काळ समायोजन करावे, शाळांचे वेतनेत्तर अनुदान त्वरित द्यावे, शिक्षकांचे दरमहा १ तारखेला वेतन मिळावे, कायम विनाअनुदानित तत्त्व रद्द करावे व कायम विनाअनुदानित शाळा व ज्यूनिअर कॉलेजला अनुदान द्यावे, यासह विविध प्रकारच्या प्रमुख १४ मागण्यांचा त्यात समावेश आहे. यासंदर्भात नाशिक जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर विकास आघाडी आयोजित संस्थाचालक संघ व शिक्षक विकास आघाडी व इतर संघटनांची सारडा कन्या विद्यालयात बैठक होऊन त्यात संच मान्यता (अतिरिक्त कर्मचारी) व इतर शासकीय धोरणांमुळे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी संस्थाचालक यांच्यावर शासनाने अन्याय केला आहे. त्यासाठी शहरातील प्रत्येक शाळेतील एक कर्मचारी व शिक्षक यांनी हुतात्मा स्मारक येथे सोमवारी (दि. ८) सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थाचालक संघाचे अ‍ॅड. नितीन ठाकरे, कोंडाजी आव्हाड, मनोज पिंगळे, अशोक सोनजे, प्रकाश सोनवणे, पुरुषोत्तम रकिबे, बाळासाहेब सोनवणे, शोभना शिंदे, सुभाष पाटील आदिंनी केले आहे. (प्रतिनिधी)