शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पुरस्काराच्या निवडीला अखेर सापडला मुहूर्त

By admin | Updated: September 2, 2016 00:34 IST

१५ शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादर

१५ शिक्षकांचे प्रस्ताव आयुक्तांकडे सादरनाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार्‍या आदर्श जिल्हा शिक्षक पुरस्काराच्या निवडीला अखेर गुरुवारी (दि.१) मुहूर्त सापडला. येथील शासकीय कन्या शाळेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आदर्श शिक्षकांचे प्रस्ताव अंतिम करण्यात आले.दरवर्षी जिल्‘ातून १५ तालुक्यांतून १५ आदर्श शिक्षकांची निवड केली जाते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. मागील वर्षी जरा उशिरानेच झालेल्या एका सोहळ्यात केवळ आदर्श शिक्षकच नव्हे तर सर्वच विभागातील पुरस्कारांचे एकत्रित वितरण करण्याचा नवीन प्रयोग करण्यात आला होता. आताही येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण होणे जरा अवघडच आहे. गुरुवारी शासकीय कन्या शाळेत आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, शिक्षण सभापती किरण पंढरीनाथ थोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, उपशिक्षणाधिकारी उर्मिला धनगर, शासकीय अध्यापिका महाविद्यालयाच्या प्राचार्य सरोज जगताप आदि उपस्थित होते. जिल्‘ातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी एकूण २८ प्रस्ताव आले आहेत. त्यातील १५ प्रस्तावांना अंतिम करण्यात येऊन ते पुरस्कार मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आले. येत्या ५ सप्टेंबरपूर्वी ते पुरस्कार जाहीर करण्यात येतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सांगितले. काही तालुक्यांतून एकेकच प्रस्ताव आल्याने त्यांनाच अंतिम करण्याची वेळ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयावर आली. त्यातही वाढीत मुदत देऊनही विलंबाने सादर करण्यात आलेल्या दिंडोरी व इगतपुरीचे प्रस्ताव स्वीकारावे की नाही, याबाबत संभ्रम होता. (प्रतिनिधी)