शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

मोफत मिळणा-या मोबदल्यापोटी दिला शंभर कोटींचा टीडीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 19:12 IST

नाशिक - देवळाली येथील सर्वे नंबर २९५ मध्ये ज्या भूखंडला महापालिकेने चुकीच्या सर्वे नंबरच्या आधारे शंभर कोटी रूपयांचा टीडीआर दिला, त्या जागेचा मुळातच टीडीआर देण्याची गरजच नव्हती. जमिनीच्या मालकांनी शासनाला ही जागा मोफत देण्याचे लेखी स्वरूपात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांना सांगितले आणि त्यानुसारच त्यांनी नजराणा भरून घेतला. त्यानंतर जो भूखंड महापालिकेला मोफत मिळणार होता, त्याच्या मोबदल्यापोटी महापालिकेने टीडीआर दिलाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदेवळाली भूखंड प्रकरणाला कलाटणीसहाणे यांचा आरोप, आयुक्त फेरतपासणी करणार

नाशिक - देवळाली येथील सर्वे नंबर २९५ मध्ये ज्या भूखंडला महापालिकेनेचुकीच्या सर्वे नंबरच्या आधारे शंभर कोटी रूपयांचा टीडीआर दिला, त्याजागेचा मुळातच टीडीआर देण्याची गरजच नव्हती. जमिनीच्या मालकांनी शासनालाही जागा मोफत देण्याचे लेखी स्वरूपात महसूल राज्यमंत्री सुरेश धस यांनासांगितले आणि त्यानुसारच त्यांनी नजराणा भरून घेतला. त्यानंतर जो भूखंडमहापालिकेला मोफत मिळणार होता, त्याच्या मोबदल्यापोटी महापालिकेने टीडीआरदिलाच कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात महापालिकेच्या अधिका-यांनी अत्यंत सदोष चौकशी केली असून चौकशी समितीचीचचौकशी करावी अशी मागणी माजी नगरसेवक आणि या प्रकरणातील याचिकाकर्ते अ­ॅड.शिवाजी सहाणे यांनी केली आहे. तर या प्रकरणात नव्याने बाहेर आलेल्यामुद्यांची फेरतपसाणी केली जाईल, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीसांगितले.महापालिकेच्या सहायक संचालकपदाचा अतिरीक्त कार्यभार आकाश बागुलयांच्याकडे शासनाने दिल्यानंतर महापालिकेत त्यांच्या नियुक्तीवरून घमासानसुरू झाले आहेत.त्यांच्या नियुक्तीस समर्थन आणि विरोध होत असतानाचकाहींनी बागुल यांच्यावर ठपका असलेल्या देवळाली येथील भूखंड घोटाळ्याचेप्रकरण बाहेर काढले तर दुस-या गटाने या प्रकरणात महापालिकेच्या चौकशीसमितीनेच बागुल यांना क्लीन चीट कशी दिली याबाबतचे अहवाल फिरवण्याससुरूवात केली. हा घोटाळा झालाच नसल्याचा चौकशी अहवाल पुढे आल्याने याप्रकरणात यापूर्वीच जनहित याचिका दाखल करणारे माजी नगरसेवक अ­ॅड. शिवाजीसहाणे यांनी पत्रकार परिषद घेतली.महापालिकेच्या आरक्षीत भूंखड ताब्यात देताना या जागेसाठी चुकीचा सर्वेनंबर दर्शविण्यात आला. त्यातून संबंधीतांना ६ हजार ७४९ प्रति चौमीदरानुसार टीडीआर मिळणे अपेक्षीत असताना प्रत्यक्षात मात्र चुकीच्यासर्वेमुळे २५ हजार १०० रूपये प्रति चौमी या दराने टीडीआर देण्यात आला.त्यातून शंभर कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजेचुकीच्या सर्वेनंबरच्या आधारे टीडीआर दिल्याचे लक्षात आल्यानंतर २०१८मध्ये तत्कालीन सहायक संचालकांनी याबाबत डीआरसी (टीडीआर प्रमाणपत्र) रद्दका करू नये अशी नोटीस बजावली होती. त्यानंतर देखील महापालिकेने २९ मेरोजी दिलेल्या चौकशी अहवालात या प्रकरणात अनियमीता नसल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे या चौकशी समितीची चौकशी करावी अशी मागणी सहाणे यांनी केली.सर्वात महत्वाचे म्हणजे सदर प्रकरणात नजराणा प्रचलीत दरानुसार न भरतासवलतीच्या दरात भरण्यासाठी जागा मालकांनी ही जागा महापालिकेला विनामोबदलादेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते.त्यानुसार तत्कालीन महसुलमंत्री सुरेश धस यांनी तसे आदेश देखील दिले होते. मात्र, त्यानंतरतहसीलदारांनी हेच आदेश पुढे नेले असताना प्रत्यक्षात महापालिकेकडून शंभरकोटी रूपयांचा टीडीआर मनपाच्या अधिका-यांनी दिलाच कसा असा प्रश्न अ­ॅड.सहाणे यांनी केला आहे. मनपाच्या अभियंत्यांनी जागेवर न जाताचयासंदर्भातील निर्णय घेतले. त्याच प्रमाणे २०१८ मध्ये यासंदर्भात सहायकसंचालकांनी नोटिस देऊन पुढे कारवाई का केली नाही असा प्रश्न देखीलत्यांनी केला.