शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रीमियम वाढीमागे टीडीआर लॉबीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:00 IST

क्रेडाईसह अन्य संघटनांचा आरोप : घरांच्या किमती भडकण्याची भीती नाशिक : नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामांना आकारण्यात येणाºया प्रीमियममध्ये (अधिमूल्य) दुप्पट वाढ करण्याचे घाटत आहे. यामागे शहरातील टीडीआर लॉबी असून, यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप क्रेडाई तसेच आर्किटेक्टच्या विविध संघटनांनी केला आहे. प्रीमियमचे दर चाळीसवरून ऐंशी टक्के झाल्यास घरांच्या किमती प्रचंड भडकणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे गृहस्वप्न भंगण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

क्रेडाईसह अन्य संघटनांचा आरोप : घरांच्या किमती भडकण्याची भीती

नाशिक : नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामांना आकारण्यात येणाºया प्रीमियममध्ये (अधिमूल्य) दुप्पट वाढ करण्याचे घाटत आहे. यामागे शहरातील टीडीआर लॉबी असून, यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप क्रेडाई तसेच आर्किटेक्टच्या विविध संघटनांनी केला आहे. प्रीमियमचे दर चाळीसवरून ऐंशी टक्के झाल्यास घरांच्या किमती प्रचंड भडकणार असून, त्यामुळे सर्वसामान्यांचे गृहस्वप्न भंगण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या प्रीमियम वाढीच्या विषयावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यात क्रेडाईसह अन्य प्रमुख संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन टीडीआर लॉबीवरच घाला घातल्याने या विषयाला आता वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेचे आरक्षित भूखंड शेतकºयांकडून खरेदी करून त्या बदल्यात महापालिकेकडून टीडीआर खरेदी करणाºया या लॉबीच्या दबावाखाली हा प्रस्ताव मंजूर केल्यास या भूखंड व्यवहाराच्या तळाशी जाण्याचा आणि भूसंपादन आवश्यक होते काय, आरक्षित भूखंडांची मालकी सध्या कोणाकडे आहे याचा शोध घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, सरचिटणीस उमेश वानखेडे, उदय घुगे तसेच आयआयएचे अध्यक्ष प्रदीप काळे, ए अ‍ॅँड ईचे सचिव चारुदत्त नेरकर, आयआयआयडीचे अध्यक्ष राकेश लोया, एसीसीईचे अध्यक्ष पुनीत रॉय यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी प्रीमियमवाढीच्या विरोधात भूमिका मांडली.महापालिकेच्या वतीने एखाद्या भूखंडावर अनुज्ञेय बांधकामापेक्षा अधिक बांधकाम करण्यासाठी टीडीआरचा वापर होत होता आणि त्याचप्रमाणे महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी नव्या विकास आराखड्यात अधिमूल्य भरून वाढीव बांधकाम करण्याची तरतूद करण्यात आली. मूळ प्रस्तावात रेडीरेकनरच्या तुलनेत १५ टक्के इतकेच प्रीमियम होते. मात्र शासनाने ते ४० टक्के केले. त्याला दोन महिने होत नाही तोच आता ४० वरून ८० टक्के इतके दुप्पट करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दोन महिन्यात अशा प्रकारचा दरवाढीचा प्रस्ताव देण्यामागे काय घडले, असा सवाल यावेळी करण्यात आला.मुळात बांधकाम व्यवसाय अडचणीत आहे. त्यात अशा प्रकारचे प्रीमियम वाढविणार असतील तर घरांच्या किमती किमान लाखो रुपयांनी भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेडाईतील ३०० पैकी २९५ जणांचा त्यास विरोध आहे. प्रीमियमच्या सध्याच्या दरामुळे टीडीआरचे भाव कमी झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार त्या-त्या वर्षातील टीडीआर हा त्याच वर्षात उपयोगात आणायचा आहे. त्यामुळे टीडीआरचा साठा करणाºयांकडून प्रीमियम वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. प्रीमियमच्या दरवाढीसाठी काही संबंधित व्यक्ती प्रयत्न करीत असून, दरवाढ करू नये यासाठी क्रेडाईसह सर्व संघटना महापालिका आयुक्त तसेच सर्व आमदारांना विनंती करणार आहेत. त्यानंतरही दरवाढ झालीच तर आंदोलन करण्याची तयारीही संघटनांनी दाखवली आहे.