नाशिक : जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱ्या सप्ताहालाच मुळी तीन दिवस विलंबाने सुरुवात करणाऱ्या आणि आरोग्य सभापतीसह सदस्यांनाही या सप्ताहाबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनभिज्ञ ठेवणारे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. युवराज देवरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांना आरोग्य समितीच्या मासिक बैठकीत चुकीची कबुली द्यावी लागली. तर डॉ. युवराज देवरे यांनी समिती सदस्यांची माफी मागितली. याबाबत ‘लोकमत’ने २४ मार्चच्या अंकात ‘क्षयरोग अधिकाऱ्यांचे वराती मागून घोडे’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून २१ ते २८ मार्च दरम्यान राबविण्यात येणाऱ्या क्षयरोग जनजागृती सप्ताहालाच मुळात तीन दिवस उशिराने सुरुवात होत असल्याचे, तसेच याबाबत खुद्द आरोग्य सभापती किरण थोरे यांच्यासह समिती सदस्यांना या सप्ताहाची माहिती नसल्याकडे लक्ष वेधले होते.
क्षयरोग अधिकाऱ्यांनी दिली बैठकीत चुकीची कबुली
By admin | Updated: March 25, 2015 01:24 IST