शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

घोटीत वर्दळीच्या ठिकाणी टॅक्सी स्टॅण्ड

By admin | Updated: August 13, 2014 00:46 IST

घोटीत वर्दळीच्या ठिकाणी टॅक्सी स्टॅण्ड

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी गावातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेले टॅक्सी स्टॅण्डचे अतिक्रमण काढण्यास संबंधित यंत्रणा टाळाटाळ करत असल्याचा आरोप परिसरातील व्यापारीवर्गाकडून केला जात आहे. या टॅक्सी स्टॅण्डमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. घोटी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुन्या मुंबई-आग्रा महामार्गालगत विजयराज कॉम्प्लेक्ससमोर घोटी टॅक्सी चालक-मालक संघटनेने दोन महिन्यांपूर्वी रातोरात अतिक्रमण करून टॅक्सी स्टॅण्ड सुरू केले आहे. संघटनेने या ठिकाणी स्वत:चे कार्यालयही थाटले आहे. ज्या जागेवर टॅक्सी स्टॅण्ड सुरू करण्यात आले आहे त्यातील काही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची, तर उर्वरित जागा विजयराज कॉम्प्लेक्सच्या मालकीची आहे. या टॅक्सी स्टॅण्डवर लावण्यात येणाऱ्या टॅक्सींमुळे या कॉम्प्लेक्समधील व्यावसायिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुकानात माल घेऊन येणारी वाहने आणि ग्राहकांची वाहने उभी करण्यास जागा मिळत नाही. यामुळे येथील गाळेधारक व्यापारी त्रस्त झाले आहेत. सदर टॅक्सी स्टॅण्डचे अतिक्रमण हटविण्याबाबत येथील व्यापाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले असून, माहिती अधिकारांतर्गत घोटी ग्रामसेवकांकडे तक्रार अर्ज केला आहे, मात्र ग्रामसेवकाने त्यास दाद न दिल्याने व्यापाऱ्यांनी इगतपुरी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे अपील केले. गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र देऊनही ग्रामसेवक सुनावणीस हजर राहिले नाही. अखेरीस १४ जुलै २०१४ रोजी या प्रकरणी निकाल देऊन गटविकास अधिकाऱ्यांनी सदर जागेवरील टॅक्सी स्टॅण्डचे अतिक्रमण काढून टाकण्याबरोबरच त्या संबंधीचा ठरावही रद्द करण्याचे आदेश ग्रामसेवकास दिले आहेत, मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे येथील व्यापारी दत्ता गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात व्यापाऱ्यांनी ९ आॅगस्ट रोजी घोटी पोलीस स्टेशनलाही तक्रार अर्ज दाखल केला असून, टॅक्सी स्टॅण्ड हटविण्याची मागणी केली आहे. अर्जावर ज्ञानेश्वर पंडित, त्र्यंबक खराटे, कमर अन्सारी, संजय लोखंडे, नेमीचंद गांधी, संतोष कडू, प्रशांत मुनोत, प्रभाकर चौधरी, हिरामण डावखर, प्रशांत रूपवते, सूरज भगत, विमल कोकणे, संतोष आडोळे आदिंसह ४० व्यापाऱ्यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)