शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांवर करवाढीची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 00:29 IST

नाशिक : एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे अभिमानाने मिरवणाºया महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहराचा विकास व्हायचा असेल तर पैसा आणायचा कुठून, असा सवाल करत निवासी मालमत्ता करात तब्बल ३३ टक्के दरवाढीला मंजुरी देऊन नाशिककरांच्याच खिशाला हात घातला.

ठळक मुद्देकाळे शर्ट परिधान करत निषेध शिवसेनेसह विरोधकांनी ‘दादागिरी नही चलेगी’च्या घोषणांनी सभागृह दणाणून

नाशिक : एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्याचे अभिमानाने मिरवणाºया महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने शहराचा विकास व्हायचा असेल तर पैसा आणायचा कुठून, असा सवाल करत निवासी मालमत्ता करात तब्बल ३३ टक्के दरवाढीला मंजुरी देऊन नाशिककरांच्याच खिशाला हात घातला. या निर्णयानुसार, नाशिककरांना निवासी वापरासाठी आता एकूण ७६ टक्के घरपट्टी मोजावी लागणार आहे. सदर दरवाढ ही भाडेमूल्यावर आधारित राहणार असून, बिगर निवासीसाठी ६४ टक्के, तर औद्योगिकसाठी ८२ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. दरम्यान, या दरवाढीला शिवसेनेसह कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसेने कडाडून विरोध करत सत्ताधारी भाजपाचा निषेध केला. शिवाय, घोषणाबाजी करत सभात्यागही केला. विरोधकांनी आता या दरवाढीविरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीने महासभेकडे धोरणात्मक निर्णयासाठी पाठविलेल्या घरपट्टी दरवाढीच्या प्रस्तावात सुधारणा करत भाडेमूल्य तथा करयोग्य मूल्याऐवजी भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता कर आकारणीचा प्रस्ताव मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत ठेवला होता. स्थायी समितीवर यापूर्वी प्रशासनाकडून निवासी घरपट्टीत सुमारे १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु, तुकाराम मुंढे यांनी त्यात सुधारणा करत निवासी घरपट्टीत ३३ टक्क्यांपर्यंत दरवाढीशी शिफारस केली. याशिवाय, बिगर घरगुतीसाठी ५८ ते ६४ टक्के आणि औद्योगिक वापरासाठी ७६ ते ८२ टक्के दरवाढ प्रस्तावित केली. सद्य:स्थितीत तीनही प्रकारांसाठी ४३ ते ४९ टक्क्यांपर्यंत घरपट्टीची आकारणी केली जात आहे. आतापर्यंत सर्वसाधारण करामध्ये वार्षिक कर पात्र मूल्यांच्या आधारे कराच्या दरांची अ,ब,क,ड,इ अशी वर्गवारी केली जात होती. अशी असेल सुधारित दरवाढ (टक्केवारीत)कराचे नाव सद्य:स्थिती निवासी अनिवासी औद्योगिक सर्वसाधारण कर २५ ४० ६० ७० आग निवारण कर २ २ २ २ वृक्षसंवर्धन कर १ १ १ १ स्वच्छता कर ३ ६ ९ १० जललाभ कर २ ४ ६ ६ मलनिस्सारण कर ५ १० १२ १२ पथकर ३ ५ ७ १० मनपा शिक्षण कर २ ३ ५ ७ विशेष स्वच्छता कर ० ५ ५ ७

काळे शर्ट परिधान करत निषेध

 प्रस्तावित करवाढीविरोधात शिवसेनेने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. अधूनमधून सेना-भाजपात त्यावरून खटकेही उडाले आणि शाब्दिक चकमकी झडल्या. शिवसेना नगरसेवकांनी निषेध म्हणून काळे शर्ट, तर महिला नगरसेवकांनी काळ्या साड्या परिधान केल्या होत्या. करवाढीचा प्रस्ताव मंजूर होताच शिवसेनेसह विरोधकांनी ‘दादागिरी नही चलेगी’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. विरोधक सभागृहातून निघून गेल्यानंतरही आयुक्त मुंढे हे महापौरांकडे भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू करण्याचा आग्रह धरत होते.