शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीनंतर करवाढीचा बोजा

By admin | Updated: February 19, 2017 00:38 IST

महापालिकेचे अंदाजपत्रक : घरपट्टी-पाणीपट्टी वाढीचे संकेत

नाशिक : महापालिका निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून वारेमाप आश्वासने दिली जात असतानाच प्रशासनाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकात घरपट्टी व पाणीपट्टीत सुमारे पाच टक्के करवाढ प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आचारसंहितेनंतर प्रशासनाकडून सदर अंदाजपत्रक सादर होणार असून, ते १३१० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.  सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. २३ फेब्रुवारीला मतमोजणीनंतर नव्याने सत्ताधारी बसणार असले तरी १५ मार्चला महापौर- उपमहापौर निवडीनंतरच प्रत्यक्ष लोकप्रतिनिधींच्या राजवटीला पुनश्च प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी, महापालिका प्रशासनाकडून यंदा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यांसाठी लेखानुदान सादर करण्यात येणार होते परंतु त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध होऊ न शकल्याने आता थेट वार्षिक अंदाजपत्रकच प्रशासनाकडून सादर केले जाणार आहे. त्याबाबत शनिवारी (दि. १८) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या दालनात सर्व खातेप्रमुखांची बैठक होऊन आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर लगेचच प्रशासन आपल्या स्तरावर सदर अंदाजपत्रक सादर करणार आहे. सुमारे १३१० कोटी रुपयांच्या आसपास अंदाजपत्रक राहण्याची शक्यता आहे. मागील सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी तत्कालीन आयुक्तांनी १३५७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. परंतु ११२४ कोटी रुपयांपर्यंतच उत्पन्न जमा होऊ शकल्याने सुधारित अंदाजपत्रकही याच दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यंदा प्रशासनाने अंदाजपत्रकात ११७० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरले आहे. कर्जात झालेली घट आणि उत्पन्नात झालेली ५० कोटी रुपयांची वाढ यामुळे अंदाजपत्रक १३०० कोटींवर जाईल. या अंदाजपत्रकात प्रामुख्याने, प्रशासनाने उत्पन्नवाढीसाठी घरपट्टी व पाणीपट्टीत प्रत्येकी सुमारे ५ टक्के करवाढ प्रस्तावित केल्याचे समजते. त्यामुळे निवडणुकीनंतर नाशिककरांवर घरपट्टी व पाणीपट्टी वाढीचा बोजा पडण्याची शक्यता आहे. याशिवाय काही नवीन योजनांसाठीही विशेष निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण ही महापालिकेसाठी सर्वांत मोठी डोकेदुखी ठरली आहे. यापूर्वीही आयुक्तपदी प्रवीण गेडाम असताना त्यांनी गोदावरी कक्षाची स्थापना करत त्यासाठी उपआयुक्त दर्जाचा विशेष अधिकारी नियुक्त केला होता. परंतु, त्यावर प्रत्यक्ष काम दिसून आले नाही. त्यामुळे आता प्रशासनाकडून पुन्हा एकदा गोदावरी कक्षाची स्थापना केली जाणार असून त्यासाठीही विशेष तरतूद अंदाजपत्रकात केली जाणार आहे. याशिवाय, महापालिकेने डीपी रोडसाठी ज्या जागा ताब्यात घेतल्या आहेत त्यांचा विकास करण्यासाठीही तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.म