शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा एनबीटीवर भरवसा नाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:14 IST

नाशिक : ‘सोनू तुझा मायावर भरवसा न्हाय काय?’ या गाण्याचे विडंबन करून भल्ल्या-भल्ल्यांची पोलखोल केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘सोनू तुझा मायावर भरवसा न्हाय काय?’ या गाण्याचे विडंबन करून भल्ल्या-भल्ल्यांची पोलखोल केली जात आहे. आता विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनीही याचा आधार घेत महाविद्यालय अन् विद्यापीठाच्या गलथान कारभाराकडे लक्ष वेधले आहे. महाविद्यालयाच्या ऐन प्रवेशद्वारावर भले मोठे फलक लावून त्यावर ‘विद्यार्थी तुमचा एनबीटीवर भरवसा नाय काय... नाय काय?’ अशा ओळीत विद्यार्थ्यांनी निकालाविषयी भावना व्यक्त केल्या आहे. सध्या हे फलक कॉलेजरोड परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. नुकताच बीएसएल एलएलबी, बीए एलएलबी आणि एलएलबी पदवीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे; मात्र या निकालात प्रचंड गोंधळ आणि चुकांची शंभरी गाठलेली असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. या शिक्षणक्रमांचे निकाल नुकतेच लागले. त्यावेळी तेव्हा बरेचसे विद्यार्थी मोजक्याच विषयात अनुत्तीर्ण असल्याची बाब समोर आली. त्यामुळे महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स विद्यापीठाकडून मागविल्या. जेव्हा या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना मिळाल्या तेव्हा त्यामध्ये विद्यापीठाने केलेला कारभार उघड झाला. कारण गुणदान देताना ३५ ते ४० गुणांच्या बेरजेमध्येच घोळ केल्याचे समोर आले. बहुतांश विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या मधल्या पानांवर विद्यार्थ्यांना ४० ते ४५ गुण दिले गेले; मात्र उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर केवळ २५ गुण दिले.  याचा परिणाम म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या विषयात अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली असून, विद्यापीठाने विद्यार्थ्यांना नेहमीच्या पठडीतील उत्तरे दिली आहेत. शिवाय आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे; मात्र यावर तोडगा केव्हा निघेल याबाबत मात्र साशंकता असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर विद्यापीठाने केलेल्या चुका दुरुस्त न केल्यास याबाबतचे विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याचीही शक्यता आहे.  त्याच पार्श्वभूमीवर या गलथान कारभाराकडे लक्ष वेधण्यासाठी अशा उपरोधीक फलकाचा आधार घेतला आहे. बहुचर्चित ‘सोनू’गीताच्या बोलातून महाविद्यालय प्रशासन आणि विद्यापीठावर निशाणा साधला आहे. बुधवारी सकाळी महाविद्यालयाच्या समोरील दर्शनीभागात हा फलक लागला तेव्हा विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले आणि कॉलेजरोड परिसरात हा चर्चेचा विषय ठरला. आता एनबीटी विद्यार्थ्यांचा भरवसा किती टिकवते याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.