शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चवीने खाणार त्याच्या खिशाला झळ बसणार! वडापाव महागला : किराणा मालाच्या दरवाढीमुळे घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:49 IST

नाशिक : वडापावचे नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटायला लागते. झणझणीतपणा आणि चवदार गुणांमुळे वडापावने नाशिककरांना भुरळ घातलेली आहे.

नाशिक : वडापावचे नुसते नाव जरी घेतले तरी तोंडाला पाणी सुटायला लागते. झणझणीतपणा आणि चवदार गुणांमुळे वडापावने नाशिककरांना भुरळ घातलेली आहे. मात्र, ह्याच वडापावसाठी नाशिककरांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. शहरातील वडापाव विक्रेत्यांनी १ जानेवारी २०२१ पासून वडापावच्या दरात वाढ केली आहे. याशिवाय, समोसा, सॅण्डवीच, पाववडा, दाळवडा आणि भजीही महागली आहे. कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. त्यात रस्त्यांवर ठेले टाकून वडापावसह स्नॅक्सची विक्री करणारे व्यावसायिकही अडचणीत आले. अनेकांना आपले व्यवसाय बंद करावे लागले. आता कोरोनाचे सावट काहीसे कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा या व्यवसायाने उभारी घेतली असताना वाढत्या महागाईने त्याला घेरले आहे. वडापावसाठी लागणाऱ्या किराणा मालाच्या दरात वाढ झाल्याने विक्रेत्यांना हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. शहरात वडापाव प्रति नग १२ रुपयांनी विक्री केला जात होता. परंतु, वाढत्या महागाईमुळे १ जानेवारी २०२१ पासून वडापावचे दर आता १५ रुपये प्रतिनग करण्यात आला आहे. वडापावसाठी लागणारे बटाटे तसेच तेल, बेसन, पाव लादी यात दरवाढ झाल्याने विक्रेत्यांना हा दरवाढीचा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगितले जात आहे. वडापावबरोबरच समोसा, सॅण्डवीच, पाववडा, दालवडा तसेच भजी यांच्याही दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चवीने खाणाऱ्या खवय्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.साहित्यात झालेली दरवाढबटाटे - ५० रुपये किलोतेल - २१०० रुपये (१५ किलो)बेसन - ७५० रुपये (१० किलो)पाव लादी - ३५ रूपये (२४ पाव)कोरोनामुळे आम्ही व्यावसायिकही प्रचंड अडचणीत सापडलो. आता गेल्या काही महिन्यांपासून किराणा साहित्यातही सातत्याने वाढ होत आहे. ग्राहकांसाठी आम्ही दरवाढ केली नव्हती परंतु आता वाढत्या महागाईने व्यवसाय करणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव आम्ही व्यावसायिकांनी वडापावसह अन्य स्नॅक्सच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.- निवास मोरे, संचालक, नाशिक वडापाव 

टॅग्स :hotelहॉटेल