शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली की मृत्यूचा सापळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:10 IST

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

नाशिक : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुली दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालली असून, आठवडाभरात रात्रीच्या वेळी किमान दोन ते तीन गंभीर अपघात या ठिकाणी होत आहेत़ या ठिकाणी असलेली सिग्नल यंत्रणा रात्रीच्या वेळी बंद असल्याने वाहनधारक सुसाट असतात़ त्यामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, क़ का़ वाघ महाविद्यालय या ठिकाणी ज्याप्रमाणे गतिरोधक टाकलेले आहेत तसे टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़  तारवालानगर चौफुलीवर शुक्रवारी (दि़११) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मार्केट यार्डाकडून भरधाव आलेल्या एस.क्रॉस (एमएच १५, जीए ५६५७) या वाहनचालकाने दिलेल्या जबर धडकेत वॅगनआर कार (एमएच ४३, ए ८९०६) उलटली व सुमारे पंधरा फूट घसरत गेली़ सुदैवाने या अपघातात वॅगन आरमधील महिला व लहान मुलांना किरकोळ दुखापत झाली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात उत्तमराव देवरे (रा़ मातोश्रीनगर, विजयनगर, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार एसक्रॉसवरील वाहनचालकाच्या विरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दिंडोरी रोडवरील तारवालानगर चौफुलीवर अमृतधाम चौफुलीकडून येणारे, दिंडोरीरोड, मार्केट यार्ड तसेच नाशिककडून म्हसरूळ दिंडोरी रोडकडे वाहने जातात़ या ठिकाणी महापालिकेने सिग्नल यंत्रणा बसविली असली तरी वाहनधारक सिग्नल सुटेपर्यंत प्रतीक्षादेखील करीत नाही़ या चौफुलीवर वाहतूक पोलीस हे केवळ दंडवसुलीसाठी नियुक्त केले आहेत की काय असे चित्र असते़ त्यामुळे या ़ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी तसेच मुंबई-आग्रा रोडवर एकाच ठिकाणी टाकलेले पाच-सहा एकत्रित गतिरोधक बसवावे जेणेकरून प्रत्येक वाहनधारक या ठिकाणी वाहनाचा वेग कमी करेल व अपघातांची संख्या कमी होईल़ तारवालानगर चौफुलीवर पूर्वी वळणरोड लहान असल्याने लावण्यात आलेली सिग्नल यंत्रणा तसेच वृक्षावर वाहने आदळल्याच्या घटना घडलेल्या असून, अनेकांचे जीवही गेलेले आहेत़ त्यानंतर रस्ता रुंदीकरण केल्यानंतर रात्रीच्या वेळी या चौफुलीवरून भरधाव वाहने धावत असल्यामुळे पादचारी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून चौफु ली पार करावी लागते़ या ठिकाणी स्थानिक मित्रमंडळाने सीसीटीव्ही यंत्रणाही बसविलेली आहे, याद्वारे किमान कोणत्या वाहनधारकाची चूक आहे हे पोलिसांच्या लक्षात येते़विशेष म्हणजे याच रस्त्यावर नाशिक नगरीच्या महापौर दररोज ये-जा करतात़ मात्र, त्यांना तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या अपघातप्रवण चौफुलीबाबत उपाययोजना करण्याबाबत सूचत नाही, याबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे़

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा