शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक युनियनचे पंचायत समितीसमोर लक्षवेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 17:50 IST

घोटी : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास २० आॅगस्टला राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचेयावेळी निवेदनाद्वारे सांगण्यत आले.

ठळक मुद्दे राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार २० आॅगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला जाणार आहे.

घोटी : इगतपुरी तालुका ग्रामसेवक युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले. मागण्या पूर्ण न झाल्यास २० आॅगस्टला राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार असल्याचेयावेळी निवेदनाद्वारे सांगण्यत आले.लक्षवेधी आंदोलनात विविध कर्मचारी, अधिकारी संघटना सहभागी झाल्या. गटविकास अधिकारी किरण जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंडे यांना मागण्यांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.सातव्या वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करावी, प्रलंबित महागाई भत्ते सत्वर द्यावेत, मुदतपूर्व सक्तीने सेवानिवत्ती थांबवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्तपदे आणि अनुकंपाधोरण पारदर्शक करावे, निवृत्तीचे वय ६० करावे, ५ दिवसांचा आठवडा करावा अशा विविध मागण्यांसाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.शासनाच्या उदासीन कारभारामुळे लक्षवेध करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे आदेशान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषद, सरकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात भोजनाच्या सुट्टीत उग्र निदर्शने केली.जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व त्यास संलग्न असलेल्या जिल्हा ग्रामसेवक युनियन, नर्सेस संघटना, पशुसंर्वधन चिकित्सा कर्मचारी संघटना लिपीक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा विभाग कर्मचारी संघटना, अंगणवाडी मुख्यसेविका संघटना, शाखा अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना, विस्तार अधिकारी (ग्रा. प./उद्योग) संघटना, जिल्हा कृषी तांत्रिक संघटना, औषध निर्माता अधिकारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, वाहन चालक संघटना, परिचर संघटना, मैल कामगार संघटना यांच्या वतीने लक्षवेध आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य समन्वय समितीच्या निर्णयानुसार २० आॅगस्टला राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारला जाणार आहे.