शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या तोंडावर जिल्ह्यात टॅंकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:15 IST

नाशिक : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने ...

नाशिक : मागीलवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने धरणे तृप्त झाली असली तरी मे महिन्यात धरणांमधील साठा कमी झाल्याने जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. सर्वाधिक टॅंकर्स येवला तालुक्यात सुरू असून, जिल्ह्यातील एकूण ७१ गावे आणि ४५ वाड्यांना ५२ टॅंकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असली तरी मे महिन्यात टँकर्सची मोठी मागणी नव्हती. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्याने तसेच यंदा आवर्तनही घटल्यामुळे पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे वाटत होते. परंतु मे महिना संपता संपता जिल्ह्यात टँकर्स सुरू झाले आहेत. सद्य:स्थितीत ५२ टॅंकरद्वारे ७१ गावे व ४५ वाड्यांना टॅंकर्सने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यापूर्वी येवला तालुक्यात सर्वप्रथम टँकर सुरू करण्यात आला होता. आता येथील टॅंकर्सची संख्या सर्वाधिक १८ इतकी आहे. अशातच पावसाचे उशिरा आगमन झाले तर जिल्ह्यातील टॅंकर्सची संख्या वाढण्याचीदेखील शक्यता आहे.

मे महिन्याच्या प्रारंभी फारशी पाणीटंचाई जाणवली नसली तरी मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने टंचाईच्या झळा अनेक तालुक्यांना बसू लागला. जिल्ह्यात येवला तालुक्यातून टॅंकरची पहिली मागणी नोंदविण्यात आली. उन्हामुळे नदी व नाले आटले असून, विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे दहा तालुक्यांमधून टॅंकर्सची मागणी झाली. त्यानुसार त्यांना टॅंकर्स पुरविण्यात आले असून, ५२ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. शासकीय व ४५ खासगी टॅंकरने गाव, वाड्या व वस्तींवर पाणी पोहोचवले जात आहे. मागील वर्षी टॅंकर्सची संख्या पन्नासच्या जवळपास होती. रोज टॅंकर्सच्या १२२ फेर्‍या होत असल्याने गाव वाड्यांमधील ९६ हजार ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, त्र्यंबक, येवला या तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत आहे.

--इन्फो-

तालुकानिहाय सुरू असलेले टँकर्स बागलाण - ५

चांदवड - ६

देवळा - २

इगतपुरी - ३

मालेगाव - ३

नांदगाव - १

पेठ - ७

सुरगाणा - ५

त्र्यंबक - २

येवला - १८