शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

यंदा दोनच गावांचे टॅँकरचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 00:28 IST

सिन्नर : अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशाप्रकारे एकूण २९७ ठिकाणी ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे.

सिन्नर : (सचिन सांगळे) अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशाप्रकारे एकूण २९७ ठिकाणी ५५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाºया भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी कायदा लागू असल्याने नागरिक घरीच आहे.तालुक्याच्या सर्वच भागात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने ग्रामीण भागात केटिवेअर, बंधारे, विहिरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे यावर्षी वाड्या-वस्त्यांमध्ये अद्याप पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, तर दुसरीकडे लॉकडाउनमुळे शासकीय कार्यालयांंमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा अशा परिस्थितीत तालुक्यात पाणीटंचाई नसल्याने पाणीपुरवठा विभाग निवांत आहे. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा सुरू होत असत. त्यामुळे प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. दोन वर्षांपूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती होती. तसेच पावसाचेही प्रमाण कमी होते. २४ मार्च रोजी सिन्नर तालुक्यात पहिला टॅँकर सुरु झाला होता. तब्बल १६ महिने ६५ टँकरद्वारे तालुक्यातील जनतेची तहान भागविली जात होती. अनेक गावांमध्ये शासनाचा टँकर आल्यानंतरच पिण्याचे पाणी येत होते. २६ जुलै २०१९ ला तालुक्यातील सर्व पाण्याचे टँकर बंद केले असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.यावर्षी तालुक्यातील सोनगिरी व सुळेवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे प्राप्त झाला होता. सोनगिरीला कोनांबे धरणातून तर सुळेवाडीला बारागाव पिंप्री योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले आहे.दरवर्षी तालुक्याच्या पूर्व भागातून टँकरची मागणी होत असते. त्या भागातही गतवर्षी चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याने अद्यापपर्यंत टँकरची मागणी आलेली नाही. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांत तालुक्यातील अनेक गावांत मुख्यमंत्री पेयजल योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्याने पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्या आहेत.-----------------------------------सात पाणी योजनांचा आधार : सिन्नर तालुक्यात युती शासनाच्या काळात प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आल्या. आजमितीला तालुक्यात सात नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याने हजारो ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. यामध्ये मनेगावसह १६ गावे, कणकोरीसह ५ गावे, वावीसह ११ गावे, वडांगळीसह १३, ठाणगावसह ५, बारागाव पिंप्रीसह ७ व नायगावसह ९ गावे आदी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. पाणीपुरवठा योजनांमुळे भरउन्हाळ्यातही नागरिकांना दिलासा मिळत आहे. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने महिलांना पायपीट करावी लागली नाही.-----------------------भोजापूर धरणात९ टक्के साठासिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १५० टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील पाचही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. भोजापूर धरणात ३० दशलक्ष घनफूट साठा असून, त्यावर कणकोरीसह ५ गावे व मनेगावसह १६ गावे नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहे. तसेच उंबरदरी, बोरखिंड, कोनांबे, सरदवाडी, दातली, दुशिंगपूर, माळवाडी या मध्यम प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागला आहे. गेल्यावर्षी धरणात चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Nashikनाशिक