शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हुल्लडबाजी करणाऱ्यांना दंडुक्याचा प्रसाद

By admin | Updated: August 3, 2015 23:44 IST

चोख पोलीस बंदोबस्त : आसारामबापू पुलावर रायडिंगला खाकीस्टाइल ‘ब्रेक’

नाशिक : ‘फ्रेण्डशिप डे’च्या नावाखाली आसारामबापू पूल ते आनंदवली पुलापर्यंतच्या गोदाकाठ रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी दुपारच्या सुमारास दंडुक्याचा प्रसाद दिला. सकाळपासूनच आसारामबापू पुलाच्या परिसरात तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. पुलावर उभे राहून गोदाकाठच्या पात्राचे बॅग्राऊंड ‘सेल्फी’ काढताना तरुण-तरुणींचे ग्रुप दिसत होते. तसेच बहुतांश कॉलेजकुमार महागड्या दुचाकी-चारचाकी भरधाव वेगाने दामटवित स्टंटबाजी करत असल्याची माहिती दुपारच्या सुमारास गंगापूर पोलिसांना मिळाली. तसेच तरुणांचे दोन गट आसारामबापू पुलावर समोरासमोर येऊन हाणामारीच्या तयारीत असल्याची कुणकुण गुन्हे शोध पथकाला लागली होती. त्यामुळे दुपारी एक वाजेपासूनच गंगापूर पोलिसांनी आनंदवली पुलापासून आसारामबापू पुलापर्यंत पोलीस गस्त वाढविली होती. तसेच येथील गोदापार्कच्या आवारात आठ ते दहा पोलीस कर्मचारी संध्याकाळी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, बीट मार्शलचीही गस्त या भागात सुरू ठेवण्यात आली होती. दुपारनंतर सुरू असलेली कॉलेजकुमारांच्या रायडिंगला पोलिसांनी खाकीस्टाइल ‘ब्रेक’ लावला. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या बहुतांश तरुणांच्या टोळक्याला पोलिसांनी दंडुक्याने पिटाळून लावले. एकूणच मैत्रीदिनाच्या औचित्यावर उन्माद करणाऱ्या टवाळखोर कॉलेजकुमारांना पोलिसांनी चोप दिला.संध्याकाळी मखमलाबादरोडपासून आनंदवलीकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. सहा वाजता या ठिकाणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दुचाकी आडवी लावून दुचाकी व चारचाकी अशा सर्वच वाहनांना आनंदवलीकडे जाण्यासाठी प्रवेश बंद केला होता. संध्याकाळच्या वेळेस बहुतांश चारचाकी वाहनांचीदेखील पोलिसांनी तपासणी करत वाहनांमधून मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. बहुतांश युवक मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवित असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी रात्रीपर्यंत या ठिकाणी कारवाई सुरूच ठेवली होती. थेट सोमेश्वर धबधबा, कानेटकर उद्यानापर्यंत पोलीस गस्तमध्ये गंगापूर पोलिसांकडून वाढ करण्यात आली होती. (प्रतिनिधी)