शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’च्या पोर्टलशी छेडछाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:16 IST

विविध क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीआर-३ बी रिटर्न भरण्याची सोमवारी (दि.२०) अखेरची मुदत असल्यामुळे एकीकडे रिटर्न भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे काही करदात्यांना जीएसटीचा पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड करून करत्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय नाशिकमधील काही व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देवेबसाइट हॅक झाल्याचा संशय : संदिग्ध ओटीपीमुुळे करदात्यांमध्ये भीती

नाशिक : विविध क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योजकांना जीएसटीआर-३ बी रिटर्न भरण्याची सोमवारी (दि.२०) अखेरची मुदत असल्यामुळे एकीकडे रिटर्न भरण्याची लगबग सुरू असताना दुसरीकडे काही करदात्यांना जीएसटीचा पासवर्ड बदलण्यासाठी ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड करून करत्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय नाशिकमधील काही व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे काही करदात्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी त्यांची जीएसटी नोंदणी रद्द केलेली असतानाही त्यांना ओटीपी आल्याने नाशिकमधील व्यावसायिकांमध्ये जीएसटी पोर्टल हॅक झाल्याची भीती व्यक्त होत आहे.नाशिकमधील काही जाहिरात व्यावसायिक आणि कर सल्लागारांना जीएसटी पोर्टलवरून तुन्ही तुमचा यूजर आयडी व पासवर्ड विसरला आहात. पुन्हा रिसेट करण्यासाठी दिलेला ओटीपी वापरा, असा संदेश प्राप्त झाले. विशेष म्हणजे यातील एकाही करदात्याने त्याचा जीएसटी रिटर्न भरण्यासाठी पोर्टलवर लॉगीन केलेले नसतानाही अशाप्रकारचे एसएमएस आल्याने जीएसटी पोर्टलशी छेडछाड होत असून, करदात्यांची गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागल्याचा संशय राजेश कुलकर्णी, मंगेश करंदीकर आदी करदात्यांसह सनदी लेखापाल सनी मनियार यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. अशाप्रकारे करदात्यांची गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती लागल्यास करदात्यांना व्यावसायिक आणि आर्थिक फटका बसण्याची भीतीने व्यावसायिकां-कडून व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधला असता अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप जीएसटी विभागाला प्राप्त झाली नसून जीएसटी करदात्यांना काही अडचण असल्यास त्यांनी प्रादेशिक जीएसटी आयुक्तालयातील सेवा केंद्रात संपर्क साधण्याचे आवाहन जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.कोणतीही तक्रार प्राप्त नाहीजीएसटी पोर्टल संथगतीने सुरू असल्याने लॉग इन होऊ शकत नव्हते. या व्यतिक्त पोर्टलशी संबंधित कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, जीएसटी पोर्टलवरून ओटीपी गेले असतील ते कोणत्या संदर्भात आहेत याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे जीएसटीचे सहायक आयुक्त चेतन पवार यांनी सांगितले.जीएसटी पोर्टलवरून रविवारी रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी ओटीपी आला, याचा अर्थ जीएसटी पोर्टलशी कोणीतरी छेडछाड केली आहे. त्याशिवाय असा ओटीपी येणार नाही. ओटीपी येताच सीएला फोन केला. त्यांनी जीएसटी संदर्भात काहीही काम केले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोर्टलशी कोणीतरी छेडछाड केल्याचा संशय निर्माण झाला आहे.- राजेश कुलकर्णी, जीएसटी करदाताजीएसटी पोर्टलवर कोणतेही काम सुरू नसताना पहाटे साडेपाच वाजता ओटीपी आला. जीएसटी पोर्टलशी छेडछाड झाल्याशिवाय अशाप्रकारे लॉगीन न करता ओटीपी येऊ शकत नाही. त्यामुळे झालेला प्रकार गंभीर आहे. करदात्यांनी त्यांची मोठी रक्कम त्यांच्या खात्यावर डिपॉजिट केलेली असते. ही रक्कम परस्पर गायब होण्याची भीती यामुळे निर्माण झाली आहे.-सनी मनियार, सनदी लेखापाल

टॅग्स :GSTजीएसटी