शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

टमाटा बाजारभाव घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:48 IST

टमाटा बाजारभाव घसरले

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : तब्बल पंधरवड्यापासून तेजीत असलेल्या टमाट्याच्या दरात जवळपास पन्नास टक्क्यांनी घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. नारायणगाव, पुणे, खेड, मंचर या बाजार समितीत स्थानिक टमाटा माल दाखल होत असल्याने बाजारभाव घसरलेले आहेत.हंगामात १० ते १५ रुपये प्रति किलो दराने विक्री होणाऱ्या टमाट्याची आवक वाढली, तर किलोला २ रुपये असाही दर यापूर्वी मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी टमाट्याची आवक घटल्याने बाजारभाव गगनाला भिडले होते. बाजार समितीत टमाट्याच्या २० किलो वजनाच्या जाळीला १५०० ते १६०० रुपये असा बाजारभाव मिळाला होता, तर किरकोळ बाजारात टमाटा १०० ते १२० रुपये किलो दराने विक्री होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. किलोला १०० रुपये असा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला असल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले होते, तर वाढत्या बाजारभावामुळे ग्राहकांना किलोभर टमाटा खरेदी करण्यापेक्षा १० ते १५ रुपयांचे तीन ते चार टमाटे खरेदी करण्याची वेळ आली होती. टमाट्याची आवक घटल्याने परराज्यात तसेच परदेशातील टमाटा मालाची निर्यात घटली होती. काही दिवसांपासून पुणे, खेड, मंचर या भागातून टमाटा माल स्थानिक बाजार समितीत विक्रीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव घसरलेले आहेत.