शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आयमा निवडणुकीत तलवार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:03 IST

आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार यांनी ५४४ मते मिळवित विजय संपादन केला,

सिडको : आरोप-प्रत्यारोपाने गाजलेल्या अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) च्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार यांनी ५४४ मते मिळवित विजय संपादन केला, तर विरोधी गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुषार चव्हाण यांना ४९१ मते मिळाली. अवघ्या ५३ मतांनी चव्हाण यांचा पराभव झाला. गुरुवारी (दि. ३१) सायंकाळी आयमा रिक्रीएशन हॉल येथे नूतन अध्यक्ष तलवार हे पदभार स्वीकारणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.  उद्योजकांचे नेतृत्व करणाºया अंबड इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)च्या निवडणुकीत विरोधी एकता गटाने केवळ अध्यक्षपदासाठीच निवडणूक लढविल्याने २६ पैकी २५ जागा याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी मंगळवारी (दि. २९) मतदान पार पडले. अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एकता पॅनलकडून वरुण तलवार, तर विरोधी एकता पॅनलकडूनअध्यक्षपदासाठी तुषार चव्हाण या दोघांमध्ये सरळ लढत झाली. सुरुवातीस एकतर्फी वाटणाºया निवडणुकीत जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी निवडणूक चुरशीची होत गेली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १५३१ मतदारांपैकी १०४० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. एकूण ६८ टक्के मतदान झाले. आयमा निवडणुकीची बुधवारी (दि. ३०) सकाळी ९ वाजता अंबड येथील आयमा रिक्र ीएशन सेंटर येथे अध्यक्षपदाच्या एका पदासाठी मतमोजणी सुरू झाली. याठिकाणी दोन्ही गटाचे उमेदवार व त्यांचे दोन प्रतिनिधी यांच्या समक्ष मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी डी. जी. जोशी, सी. डी. कुलकर्णी, मधुकर ब्राह्मणकर यांच्यासह मतदान प्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर वरुण तलवार हे काही मतांनी पुढे होते. यानंतर काही मतदान मोजल्यानंतर दोघांमध्ये काही मतांचाच फरक होता. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या एकता पॅनलचे उमेदवार वरुण तलवार यांनी ५४४ मते मिळवित विजयी संपादन केला, तर विरोधी गटाचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुषार चव्हाण यांना ४९१ मते मिळून ५३ मतांनी त्यांचा पराभव झाला. या मतमोजणीच्या वेळी पाच मते अवैध ठरली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले. सर्वांना सोबत घेऊन काम करूमतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविल्यानेच माझा विजय झाला. दोन्ही गट हे एकता पॅनलचेच असून, निवडणुकीपुरते वेगळे झालो असलो, तरी दोन्ही एकता पॅनल हे एकच आहे. आता निवडणूक झाली असून, कोणतीही कटूता न ठेवता सर्व सहकाºयांना एकत्र घेऊन व वरिष्ठांच्या मार्गदशनाखाली उद्योजकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार. निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोप झाले असले तरी ते निवडणुकीपुरतेच होते. यापुढील काळात जाहीरनाम्यात दिलेले उद्योजकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार आहे.  - वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा

टॅग्स :Electionनिवडणूक