शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

एनपीएवरून नामको बॅँकेच्या सभेत वादळी चचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:36 IST

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेचा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता दर) तीन टक्क्यांवरून वाढून १७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने त्याचे पडसाद नामको बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. वार्षिक सभेत माजी संचालकांनी बॅँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांना याच मुद्द्यावरून धारेवर धरले, तर ठराव होऊनही त्याचा इतिवृत्तात समावेश नसल्याने प्रशासकांनी सभासदांकडे दिलगिरी व्यक्त केली.सातपूर येथील ...

नाशिक : नाशिक मर्चंट बॅँकेचा एनपीए (अनुत्पादक मालमत्ता दर) तीन टक्क्यांवरून वाढून १७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याने त्याचे पडसाद नामको बॅँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटले. वार्षिक सभेत माजी संचालकांनी बॅँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांना याच मुद्द्यावरून धारेवर धरले, तर ठराव होऊनही त्याचा इतिवृत्तात समावेश नसल्याने प्रशासकांनी सभासदांकडे दिलगिरी व्यक्त केली.सातपूर येथील नामको बॅँकेच्या मुख्य कार्यालयात प्रशासक जे. बी. भोरिया यांच्या उपस्थितीत नामकोच्या ५८व्या वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या सुरुवातीपासूनच गोेंधळाला सुरुवात झाली. हेमंत धात्रक, प्रफ्फुल्ल संचेती, पंडित कातड यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी नामको बॅँकेची निवडणूक घेण्याचा ठराव एकमुखाने मंजूर केला होता. त्याचा इतिवृत्तात समावेश नसल्याबाबत प्रशासकांना धारेवर धरले. तसेच अपात्र संचालकांनी निवडणुकीची मागणी केल्याचे चुकीचे पत्र रिझर्व्ह बॅँकेला पाठविल्याबाबत सभासदांची माफी मागण्याचा आग्रह धरला. प्रसाद सबनीस यांनी आपण थकबाकीदार असल्याचा चुकीचा उल्लेख केल्याबाबत जे. बी. भोरिया यांनी माफी मागण्याची सूचना केली. त्यावर ठरावात समावेश नसल्याबाबत तसेच सबनीस यांनी केलेल्या सूचनेनुसार जे. बी. भोरिया यांनी दिलगिरी व्यक्त केली. गजानन शेलार यांनी बॅँक वाचली पाहिजे, त्यासाठी स्पर्धेच्या युगात अन्य राष्टÑीयीकृत बॅँकांच्या धर्तीवर बॅँकेचे कामकाज सुरू करावे, त्यासाठी कोअर बॅँकिंगची सुविधा करावी, यासाठी तीन ते चार कोटींची तरतूद अहवालात धरावी, अशी सूचना केली. सोहनलाल भंडारी, नरेंद्र पवार यांनी सुरतसह अन्य शाखांना बेकायदेशीर कर्जवाटपाबाबत तसेच अन्य बॅकांच्या तुलनेत नामकोचा व्याजदार जास्त असल्याने नियमित शेकडो कर्जदार अन्य बॅँकांकडे वळत असल्याचे सांगितले. श्रीकृष्ण शिरोडे यांनी बॅँकेची निवडणूक व्हावी, यासाठी आपण वित्तमंत्री अरुण जेटली व सहकारमंत्री राधामोहनसिंग यांची भेट घेऊन निवेदन दिल्याचे सांगितले. बॅँकेचा वाढलेला एनपीए आणि संचालक मंडळाची निवडणुकीचा ठराव यावरून सभासदांनी प्रशासक जे. बी. भोरिया यांना धारेवर धरले. अखेर दुसºयांदा संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचा ठराव संमत करण्यात आला. बॅँकेचे सभासद राजेंद्र महाले, विजय बोरा, सुनील बोडके, गौतम सुराणा, माधवराव भणगे, मधुकर हिंगमिरे यांनी विविध सूचना मांडल्या. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.