शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तळीरामांनी वळविला खेड्यांकडे मोर्चा

By admin | Updated: May 8, 2017 01:00 IST

तळवाडे दिगर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बिअर बारवर मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांनी मोर्चा आता खेड्यांकडे वळवला आहे

!लोकमत न्यूज नेटवर्कतळवाडे दिगर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तसेच शहरातील बिअर बारवर मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांनी आपला मोर्चा आता खेड्यांकडे वळवला आहे. तळवाड्यात गावठी दारूसोबतच देशी-विदेशीचे सर्वच ब्रँड सर्रासपणे विकले जात असल्याची चर्चा सुरू असल्याने आजूबाजूच्या खेड्यावरून येणाऱ्या ‘मद्यपी पाहुण्यां’ची वर्दळ वाढल्याने गावकऱ्यांकडून मद्यविक्री थांबविण्याची मागणी केली जात आहे.मागील काही वर्षांपासून थंड पेयच्या नावाखाली ‘सर्व’च पेय काही टपऱ्यांवर अवैधरीत्या सर्रासपणे विकले जात आहेत. विशेष बाब म्हणजे मद्यपींची संख्याही दिवसेंदिवस वाढतच गेली असून, वयस्करांपेक्षा तरुण व अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे. सदर बाब भावी पिढीसाठी अत्यंत गंभीर असून, आई-वडिलांना चिंतन करावयास लावणारी आहे. सध्या सुट्यांचे दिवस असल्याने वारकरी संप्रदायामार्फत गावातील तसेच परिसरातील बालगोपाळांसाठी व्यसनमुक्ती प्रचारक कृष्णा रौंदळ यांच्या मार्गदर्शनाने बालसंस्कार केंद्र चालवले जात असून, शेजारीच असलेल्या ग्रामपंचायतीच्या आवारात काही मद्यपी दारूच्या बैठकीसाठी अंधाराची वाट पाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. मद्यविक्रीच्या बाबतीत महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष धुसफुसत असून, असंतोषाची ठिणगी पडण्याआधीच ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने अवैध दारूविक्र ी तत्काळ बंद पाडावी व गाव व्यसनमुक्त करावे, असे ज्येष्ठ नागरिकांकडून बोलले जात आहे.