शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गावासाठी पाणी पुरवठा करणारा टेकेश्वर बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:22 IST

अंदरसुल : अंदरसुल ग्रामपंचायतचा टेकेश्वरी येथील पाणीपुरवठा बंधारा पालखेड डाव्या कॅनॉलच्या प्रासंगिक आरक्षणाच्या पाण्याने भरण्यात आला होता. नंतर बंधारा ...

ठळक मुद्देग्रामपंचायतच्या सोलर वॉटरपम्पद्वारे टँकर भरून देण्याची तयारी दर्शविली.

अंदरसुल : अंदरसुल ग्रामपंचायतचा टेकेश्वरी येथील पाणीपुरवठा बंधारा पालखेड डाव्या कॅनॉलच्या प्रासंगिक आरक्षणाच्या पाण्याने भरण्यात आला होता.नंतर बंधारा संपूर्ण भरल्यानंतर फोडण्यात पण आला होता, तरीही अंदरसुलच्या ग्रामस्थानी सलग चार-पाच तास मेहनतीने व मशिनरींच्या साह्याने फुटलेला बंधारा संपूर्णपणे दाबून बंदिस्त केला, आणि ओहोटीच्या पाण्याने पुन्हा संपूर्ण भरला त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहीरीला भरपूर पाणी वाढले व अंदरसुल गावातील नळांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले.पण तालुक्यातील पूर्व भागातील गावांना येवला नगरपालिकेच्या साठवण बंधाऱ्याच्या जवळील विहिरीवरु न पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. तालुक्यातील इतर भागातील टँकर पण त्याच ठिकाणी टँकर भरायला येतात, त्यामुळे तिथे टँकरची लाईन लागायची व प्रत्येक टँकरची एक खेप होणे दुरापास्त होत असे.शिवाय अंतर पण वाढतअसे हे येवला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच विनिता सोनवणे व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्याशी संपर्ककरत सदरच्या पाणी पुरवठा विहिरीवरु न येवला तालुक्यातील पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर भरु न देण्यासाठी विचारणा केली असता तात्काळ अंदरसुल ग्रामपंचायत प्रशासनाने होकार कळवुन ग्रामपंचायतच्या सोलर वॉटरपम्पद्वारे टँकर भरून देण्याची तयारी दर्शविली.त्याप्रमाणे अंदरसुल ग्रामपंचायतच्या प्रशासनाने रोज चार टँकरद्वारे प्रत्येकी दोन असे आठ टँकर भरु न देत आपल्या आजुबाजुच्या खेड्यातील बांधवांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.(फोटो ०३ अंदरसुल २)