शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

विमानसेवेचे १५ डिसेंबरपासून टेकआॅफ शासनाचे आश्वासन : हेमंत गोडसे यांचे दिल्लीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:11 IST

नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला.

नाशिक : नाशिकसह राज्यातील विमानसेवांसाठी मुंबई विमानतळावर वेळेच्या आरक्षणाची (टाइम स्लॉटची) उपलब्धता करून द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात गुरुवारी (दि. २६) मोर्चा काढला. सदर मोर्चा खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी केंद्र सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेत टाइम स्लॉटला मान्यता देत १५ डिसेंबरच्या आत विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र नागरी उड्डाण मंत्रालयाने शिष्टमंडळाला दिले. केंद्र शासनाच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने वर्षभरापूर्वी उडान योजनेची घोषणा केली. छोट-छोटी विमानतळे मोठ्या विमानतळांना जोडणे हा हेतू या योजनेमागे आहे. या योजनेंतर्गत नाशिकसह राज्यातील पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आदी शहरे मुंबई विमानतळाशी जोडली जाणार आहेत. खासदार हेमंत गोडसे यांनी सतत पाठपुरावा करूनही जी.व्ही.के. कंपनीने राज्यातील विमानतळांना मुंबईत टाइम स्लॉट नसल्याचे स्पष्ट करत सुरू होणाºया विमानसेवेला खीळ घातली. मात्र गुजरातमधील कांडला, सुरत, पोरबंदर येथील विमानतळांना आॅगस्ट महिन्यात टाइम स्लॉट उपलब्ध करून दिला. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. शिवसैनिकांनी थेट दिल्ली येथील नागरी वाहतूक मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चा मंत्रालयावर येताच आंदोलकांनी केंद्र सरकार आणि जी.व्ही.के. कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यपद्धतीचा निषेध केला. मोर्चात खासदार हेमंत गोडसे, शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष निरज शेठी, उत्तर भारतीय संघाचे विनय शुक्ला, सेनेचे पंजाब प्रदेशाध्यक्ष योगीराज शर्मा, बिहारचे कोशलेंद्र शर्मा आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.नागरी वाहतूक मंत्रालयाकडून वेळेची मान्यताआंदोलनानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्या शिष्टमंडळाने नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी शासन आणि जी.व्ही.के. कंपनीकडून राज्याच्या विमानसेवेवर झालेल्या अन्यायाबाबत हेमंत गोडसे यांनी अधिकाºयांना माहिती दिली. आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन टाइम स्लॉटला मान्यता देत काहीही झाले तरी १५ डिसेंबरच्या आत नाशिकची विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र अधिकाºयांनी दिले. यावेळी नागरी वाहतूक मंत्रालयाचे उषा पाधी, रु बीना अलीम, जी. के. चोखीयाल, उमेश भारद्वाज, अनुप पंथ आदी अधिकारी उपस्थित होते. नागरी वाहतूक मंत्रालयाने लेखी हमीपत्र दिल्यावर आनंदलेल्या शिवसैनिकांनी मिठाई वाटत आनंदोत्सव साजरा केला.