नाशिक : जिल्'ात ९ ते १५ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल १७ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून, त्यातील ११२ हेक्टरवरील शेतपिकाचे ५० टक्क्यांच्या आत, तर १९४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ५० टक्क्यांच्या वर नुकसान झालेले आहे. दरम्यान, कृषी व सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन त्यात अवकाळी पावसाने झालेल्या शेतपिकांची माहिती घेतली. तसेच तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो तत्काळ शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्यात.
१९४ हेक्टर शेतीचे ५० टककयांवर नुकसान केदा अहेरांनी घेतला आढावा
By admin | Updated: November 18, 2014 00:41 IST