शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा सांभाळून या, रस्त्यावर खड्डे फार आहेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:18 IST

कळवण शहरातील मेनरोडच्या रस्त्याचे सध्या काम चालू असल्यामुळे एसटी बसस्थानक ते मराठी शाळा, अंबिका चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक ...

कळवण शहरातील मेनरोडच्या रस्त्याचे सध्या काम चालू असल्यामुळे एसटी बसस्थानक ते मराठी शाळा, अंबिका चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू असून रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. रस्त्याच्या कामावरील माती मुरुम रस्त्यावर टाकल्याने पावसामुळे रस्त्यावर पावलोपावली खड्डे पडल्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अवस्था झाली आहे. शुक्रवारी सर्वत्र गणरायाचे आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनाची कळवण शहर व तालुक्यात जय्यत तयारी सुरू झाली असून शहरात युध्दपातळीवर मंडप उभारण्याचे काम सुरू केले असल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे. कळवण शहरातील मुख्य मार्ग असलेल्या मेनरोड या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे तसेच गणेश मंडळासमोर असलेल्या खड्ड्यांची समस्या मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भेडसावणार आहे. त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यावरूनच गणरायाचे आगमन भक्तांना करावे लागणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात ओम गणेश, महाराजा, गणेशनगर, महाराज, आयर्न, के.के. (महाराज)पगार, राजेग्रुप, तिरंगा, शिवबा, समर्थ फ्रेण्डस, सुभाषपेठ, श्रीकृष्ण, कृष्णा, रामराज्य, गांधी चौक, स्वाभिमानी, इंद्रप्रस्थ, कळवणचा राजा, भगवे वादळ, संगमेश्वर रामनगर, प्रिन्स, शिवराष्ट्र, हिंदवी स्वराज्य, मोरय्या, राजे छत्रपती, राजे शाहू, शिवराज्य, मोठादेव, राजगर्जना, राजमुद्रा, छत्रपती बाबा ग्रुप, ओम ग्रुप, कळवण आदर्श सोशल ग्रुप, संभाजीनगर, जयविजय, श्री श्री १००८ महामंडलेश्वर आदी गणेश मंडळ प्रसिद्ध आहेत. मात्र यावर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे.

इन्फो

प्रशासनापुढे आव्हान

मेनरोडच्या दुतर्फा असलेल्या गणराय मूर्तीविक्रीच्या स्टाॅलमधून मूर्ती घेऊन गणेश मंडळे वाजतगाजत गणरायांची स्थापना करतात. मात्र या मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने या खड्ड्यांमधून गणेशभक्तांना मूर्ती स्थापन करण्यासाठी घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे यंदाही गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार असल्याचे चित्र आहे. शिवाय या खड्ड्यांमुळे दहा दिवस गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.

इन्फो

डागडुजीची मागणी

शहरातील नगरपंचायत हद्दीतील सिमेंट काँक्रीटचे रस्ते चकाचक आहे. परंतु कळवण शहरातून गेलेल्या राज्यमार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून एकेरी वाहतूक सध्या चालू आहे. एका बाजूला काम सुरू असून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यांची अवस्था बिकट आहे. एसटी बसस्थानक ते महाराजा चौक ते अंबिका चौक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडून पाण्याची डबके झाल्यामुळे डबक्यातून वाहने चालवावी लागत आहेत. या खड्ड्यांची डागडुजी गणेशाच्या आगमनापूर्वी व्हावी अशी अपेक्षा आहे.

फोटो- ०८ कळवण होल

080921\08nsk_25_08092021_13.jpg

फोटो- ०८ कळवण होल