शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

बुलेट घेऊन ठेवा.. मी येतोच!

By admin | Updated: September 19, 2016 23:05 IST

खडांगळीकर शोकसागरात : शहीद संदीपच्या आठवणींनी सारेच गहिवरले

शैलेश कर्पे ल्ल सिन्नर‘बुलेट घेऊन ठेवा, मी २८ सप्टेंबरला सुटीवर येणार आहे..’ असे शहीद संदीप ठोक या वीर जवानाने फोनवर सांगितले होते. शनिवारी सायंकाळी कुटुंबीयांसोबत संदीप यांचे शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर रविवारपासून त्याचा फोन लागत नसल्याने ठोक कुटुंबीय काळजीत होते. सोमवारी पहाटे संदीप यास वीरमरण आल्याची वार्ता खडांगळी गावात आली आणि संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे चित्र होते. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी कुटुंबातील संदीप सोमनाथ ठोक (२५) हे २०१४ मध्ये भारतीय लष्करात भरती झाले. १७ आॅक्टोबर १९९१ रोजी जन्मलेल्या संदीप यांनी प्राथमिक शिक्षण खडांगळी शाळेत घेतले. त्यानंतर वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर सिन्नर महाविद्यालयात किमान कौशल्य शाखेचे शिक्षण सुरू केले. याचवेळी पनवेल येथे लष्कराची भरती सुरू होती. संदीप यांनी पनवेल गाठले. शेतीकाम व कष्ट करण्याची तयारी असल्याने पहिल्याच प्रयत्नात संदीप यांची लष्करात भरती झाली. त्यानंतर संदीप यांनी बिहार, बेंगळुरू, पश्चिम बंगाल, भूतान व जम्मू येथे सेवा केली.सुमारे दोन वर्षाच्या लष्कराच्या नोकरीत संदीप जेव्हा घरी येत तेव्हा कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत मनमोकळ्या गप्पा मारत होते. संदीप यांचा मित्रपरिवार मोठा होता. घरी आल्यानंतर संदीप यांनी शेतीकामाची लाज कधी बाळगली नाही. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच संदीप हे सुटीवर आले होते. संदीप यांची दोन महिन्यांपूर्वीच काश्मीर खोऱ्यातील उरी शहरात बदली झाली होती. तेव्हापासून संदीप उरी येथे होते. भारतीय लष्कराच्या ताब्यातील एका तळात घुसून दहशतवाद्यांनी सशस्त्र आत्मघाती हल्ला केला. यात २० जवान शहीद झाले. यात सिन्नर ताालुक्यातील खडांगळी येथील संदीप ठोक यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती रविवारी पहाटे खडांगळी गावात पसरल्यानंतर ग्रामस्थ शोकसागरात बुडाले. संदीप ठोक यांची वस्ती खडांगळी-सोमठाणे रस्त्यावर आहे. ठोक यांच्या कुटुंबीयांना लवकर या घटनेची माहिती समजू नये व त्यांना धक्का बसू नये याची काळजी घेण्यात येत होती. मात्र काही काळातच ही माहिती समजताच ठोक कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. शहीद संदीप यांच्या पश्चात आजी, आई, वडील, भाऊ, वहिनी, दोन बहिणी असा परिवार आहे.