इंदिरानगर : श्रद्धाविहार कॉलनी परिसरात सकाळी चोरट्यांनी वृद्धेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीची सोनसाखळी खेचून पलायन केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सायबालिनी निरंजन त्रिपाठी या सकाळी आठ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ९८ हजार ५०० रुपये किमतीची सोनसाखळी ओढून पलायन केले. या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये पुन्हा एकदा भीती व्यक्त केली जात आहे. सकाळ आणि फिरण्यासाठी निघालेल्या वृद्ध महिलांना टार्गेट केले जात असल्याच्या घटना यापूर्वी परितरात घडल्या होत्या. या घटनांची पुनरावृत्ती झाल्याने परिसरात असुरक्षितता निर्माण झाली आहे.
एक लाखाची सोनसाखळी घेऊन पलायन
By admin | Updated: July 2, 2015 23:56 IST