शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या औद्योगिक क्रांतीचा लाभ घ्यावा

By admin | Updated: May 29, 2016 22:51 IST

संजय जोशी : राज्यस्तरीय उद्यम कौस्तुभ पुरस्काराचे वितरण उत्साहात

नाशिक : माहिती तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल होत असून, सर्वांनी तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक आहे. सगळेच जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे असून, याचा फायदा उद्योगजगताने करून घ्यायला हवा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री संजय जोशी यांनी ‘बीबीएन ग्लोबल’ यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय परिसंवाद तसेच ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी व्यक्त केले. रविवारी अंबड येथील इंजिनिअरिंग क्लस्टर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ब्राह्मण बिझनेस नेटवर्कतर्फे आयोजित या कार्यक्रमात पुढे बोलताना संजय जोशी यांनी ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन तसेच समाजातील लोकांना बरोबर घेऊन उद्योगवाढीसाठी योग्य मदत करण्याचे आवाहन केले. समाजातील सर्वच घटकांचा विकास होणे आवश्यक असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले. २१व्या शतकातील बदलत्या तंत्रज्ञानाचे सर्वांना प्रशिक्षण द्यायला हवे तसेच याप्रकारचे उद्योगमेळावे कायम आयोजित करून त्यात सगळ्यांना सामावून घेण्याचेही आवाहन जोशी यांनी यावेळी केले.