शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

जनतेचे धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 16:08 IST

मालेगाव : शहरात धान्य वितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरु आहे. धान्य वितरण अधिकारी दुकानांची पाहणी करत नाही. जनतेच्या धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा. नियमानुसार धान्य वाटप झाले नाही तर स्वत: स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करु असा इशारा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी दिला. यावेळी इस्माईल यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले .

ठळक मुद्देमुफ्ती मोहंमद : अधिकाऱ्यांना धरले धारेवर

मालेगाव : शहरात धान्य वितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरु आहे. धान्य वितरण अधिकारी दुकानांची पाहणी करत नाही. जनतेच्या धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा. नियमानुसार धान्य वाटप झाले नाही तर स्वत: स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करु असा इशारा आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी दिला. यावेळी इस्माईल यांनी धान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.आमदार मुफ्ती मो इस्माईल यांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या दालनात धान्य वितरण अधिकारी कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुफ्ती यांनी मे महिन्यात प्रांत शर्मा यांना निवेदन दिले होते व कारवाईची मागणी केली होती. यानंतर दुकानदारांना नियमानुसार धान्य वाटपाच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, काही दुकानदारांचा धान्य काळबाजार सुरु असल्याने मुफ्ती यांनी आढावा घेत धान्य वितरण कार्यालयाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.

शासन जनतेला मोफत धान्य देत आहे. तरीही अनेक नागरिकांना मोफतचे धान्य उपलब्ध होत नाही. शहरात १३० रेशन दुकानांद्वारे धान्य वाटप केले जाते. १५ हजार अंत्योदय तर २८ हजार बीपीएल कार्डधारक आहेत. शासनाकडून दरमहा या लाभार्थ्यांसाठी धान्य प्राप्त होते. मात्र, त्यांना लाभानुसार धान्य दिले जात नाही.

पिवळ्या शिधापत्रिका धारकांना साखरचे वाटपच होत नाही. धान्याची ऑनलाईन पावती दिली जात नाही. दुकाननिहाय धान्य वाटपाची चौकशी करुन जबाबदार दुकानदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना मुफ्ती यांनी प्रांत शर्मा यांना दिल्या. बैठकीस प्रभारी धान्य वितरण अधिकारी पी. बी. मोरे, कार्यालय अधीक्षक विजय खरे आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार