शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजी करणाऱ्या खतविक्रेत्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:11 IST

सिन्‍नर : रासायनिक खतांची साठेबाजी करून काही खत विक्रेते जादा दराने बेकायदेशीर विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची ...

सिन्‍नर : रासायनिक खतांची साठेबाजी करून काही खत विक्रेते जादा दराने बेकायदेशीर विक्री करत आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी पूजा गायकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील खत दुकानदार बेकायदेशीररीत्या रासायनिक खतांची खासगी जागेत साठेबाजी करत आहेत. असे खत जादा दराने शेतकऱ्यांना विकत आहेत. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. कोरोनाकाळात बाजारपेठा बंद असल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. आता खतांच्या वाढत्या दरामुळे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यातील खत दुकानदारांनी खतसाठा रजिस्टरची तपासणी करून खासगी जागेत ठेवलेला माल शासनजमा करण्यात यावा, जास्त दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा संपर्कप्रमुख बबन जगताप, अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, एस.एस. लहामगे आदींच्या सह्या आहेत.

कोट...

काही खतविक्रेते बेकायदेशीर रासायनिक खतसाठा करून शेतकऱ्यांना वाढीव किमतीत विक्री करत असल्याचे खात्रीपूर्वक माहिती मिळाल्याने प्रांताधिकाऱ्याना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. परिसरात कोणी खत विक्रेता वाढीव दर लावून पक्क्या बिलाशिवाय खते विक्री करत असेल, तर तालुक्यातील शेतकरी बांधवांनीही तक्रार करावी.

-बबन जगताप, जिल्हा संपर्कप्रमुख, भूमिपुत्र शेतकरी संघटना