शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार, बीडीओंना निलंबित करण्याची तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:15 IST

नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक चुकीची माहिती दिल्यास कारवाई

नाशिक : ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यावर त्यांच्या निवडणुकी-बाबतची अचूक माहिती न पाठविल्यास संबंधित गटविकास अधिकारी व तहसीलदारास जबाबदार धरून थेट निलंबनाची कारवाई करण्याची तंबी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी दिली. त्याचबरोबर हगणदारीमुक्त व ग्रामपंचायतींच्या अतिक्रमणाबाबत दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱ्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, नाशिक या तालुक्यातील काही ग्रामपंचायतींची पाच वर्षांची मुदत टळून गेल्यावरही त्यांच्या निवडणुका घेण्यासाठी अचूक माहिती न दिल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या मुदतीत निवडणुका घेता आल्या नाहीत, त्याबाबत निवडणूक आयोगाने गांभीर्याने दखल घेऊन नाशिक जिल्ह्णाच्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केल्यामुळे भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व गटविकास अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी सर्वांनाच धारेवर धरत ग्रामपंचायतींची माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची अशी विचारणा केली. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी जी पहिली बैठक ग्रामपंचायतीची होईल त्या तारखेपासून ग्रामपंचायतीचा पाच वर्षांचा कालावधी धरला जात असताना त्याबाबतची माहिती गटविकास अधिकाºयास असणे क्रमप्राप्त असल्याचेही त्यांनी सांगितले.या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी गटविकास अधिकाºयांना धारेवर धरताना ग्रामपंचायत सदस्यांबाबत चुकीची माहिती प्रशासनाला दिली जात असल्याचा ठपका ठेवला. एकीकडे संपूर्ण जिल्हा हगणदारीमुक्त झाल्याचा दावा केला जात असताना ग्रामपंचायत सदस्य वा सरपंचाकडे शौचालय नसल्याचे अपिले कशी काय दाखल केली जातात, असा सवाल त्यांनी विचारला व याबाबत गावपातळीवरूनच दिशाभूल व चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतींच्या जागेवर अतिक्रमणाची बाबही अशाच प्रकारची असून, सदस्यांकडून अतिक्रमण केले जात असताना ग्रामसेवक कधी अतिक्रमण झाले नाही, असा अहवाल देतो व कधी अतिक्रमण केले आहे, अशी दुहेरी माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याने त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी गटविकास अधिकाºयांची असल्याचे सांगितले.सरपंचाची निवडणूक तहसील कार्यालयामार्फत पार पाडली जात असल्यामुळे त्यांनीही याबाबत जागरूक राहणे गरजेचे असून, यापुढे ग्रामपंचायतीची माहिती पाठविण्याची संयुक्त जबाबदारी गटविकास अधिकारी व तहसीलदारांची असून, त्यात कुचराई केल्यास थेट निलंबित करण्यात येईल, असा इशारा दिला

टॅग्स :Governmentसरकार