शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ताहाराबाद : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईसह आजीचा बुडून मृत्यू

By admin | Updated: November 4, 2014 23:59 IST

ताहाराबाद : मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात आईसह आजीचा बुडून मृत्यू

ताहाराबाद : येथून जवळच असलेल्या द्वारकाधीश साखर कारखान्यालगतच्या नालाबांधमध्ये असलेल्या पाण्यात बुडणाऱ्या तीन वर्षाच्या बालकास वाचविताना मुलाच्या आईसह आजीचा करूण अंत झाला.द्वारकाधीश कारखान्याजवळ काठेवाडी वास्तव्यास आहेत. येथून जवळच असलेल्या नालाबांधमध्ये कपडे धुण्यासाठी महिला रोज जात. मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बेनाबाई सोंडा पवार (२८), अतीबाई सव्वाभाई पवार (४५) व सोनाबाई राहुल पवार (२५) या कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत महेश सोंडा पवार (३) हा बालकही होता. महेश पाण्यात खेळता खेळता पाण्यात गेला. हे त्याची आई बेनाबाईच्या लक्षात येताच ती त्याला पाण्यातून काढण्यासाठी गेली. महेशला पाण्यातून काढत असताना तिचा पाय सरकल्याने तिने महेशला किनाऱ्यावर फेकले. काठावरील सोनाबाईने महेशला झेलले. परंतु त्याचवेळी बेनाबाई पाण्यात बुडू लागल्याने तिला वाचविण्यासाठी चुलत सासू अतीबाई पाण्यात उतरल्या. मात्र दोघी पाण्यात बुडाल्या. काठावर उभ्या असलेल्या सोनाबाईने आरडाओरड केली. काठावर वाचविणाऱ्यांची गर्दी होईपर्यंत या दोघींचा बुडून मृत्यू झाला होता.याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघींच्या मृतदेहाचे नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता अंतापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बेनाबाईच्या पश्चात मुलगा, दोन मुली तर अतीबाईच्या पश्चात पती, पाच मुले, मुलगी असा परिवार आहे.