शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:05 IST

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, थकलेले मानधन तत्काळ द्यावे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी नाशिक तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

गंगापूर : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परिचालकांना कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, थकलेले मानधन तत्काळ द्यावे आदी महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी नाशिक तालुक्यातील संगणक परिचालकांनी बुधवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. नाशिक पंचायत समितीसमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनप्रसंगी विविध घोषणा देऊन शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी संगणक परिचालक संघटनेचे नाशिक तालुकाध्यक्ष शांताराम बेंडकोळी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे सहायक गटविकास अधिकारी विनोद मेढे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी १९ आॅगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. शासनाच्या उदासीन धोरणामुळे संगणक परिचालकांचे कुटुंब उपासमार सहन करीत आहे. काही महिन्यांपासून मानधन थकले असून, संगणक परिचालकांनी अनेक प्रकारचे कर्ज काढून ते फेडत नसल्याने चिंतेत आहेत. शासनाने संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देऊन आश्वासनाची पूर्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नाशिक पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात हिरामण बेंडकोळी, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, समाधान ससाणे, सीमा गोसावी, पूजा राजपूत, पूजा कुलकर्णी, शांताराम निंबेकर, रोहित अनवट, लहानू कचरे, बहिरू निंबेकर, चंद्रकांत थेटे, रोहित गायकवाड आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNashikनाशिक