शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

स्वीय सहायकांवर बदलीची टांगती तलवार

By admin | Updated: September 2, 2014 01:11 IST

स्वीय सहायकांवर बदलीची टांगती तलवार

नाशिक : जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव सकाळे व अध्यक्ष जयश्री पवार यांचे स्वीय सहायक जी. पी. खैरनार यांच्यात झालेल्या हमरी-तुमरीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी पदाधिकाऱ्यांच्या सर्वच स्वीय सहायकांच्या बदलीचे संकेत दिले आहेत.वर्षानुवर्षे एकाच जागेवर असलेल्या स्वीय सहायकांमुळेच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याच्या निष्कर्षाप्रत प्रशासन आल्यानेच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या स्वीय सहायक नेमणुकीवरून यापूर्वीही वाद झाले असून, अमुकच पी.ए. हवा यावरून प्रशासन विरुद्ध पदाधिकारी असा संघर्ष यापूर्वीही टोकाला गेल्याचे समजते. त्यात उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी अमुकच पी.ए. हवा म्हणून यापूर्वी थेट मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिल्याचा इतिहास आहे, तर अध्यक्षांचे स्वीय सहायक बोलताना उर्मट बोलतात, अशी टीका काही अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना यापूर्वी केली आहे. कालच्या प्रकरणात तर थेट मंजूर नस्तीच संबंधित विभागातून पदाधिकाऱ्यांनी नेमलेले कर्मचारी घेऊन गेल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने, तर प्रशासन प्रमुख म्हणून सुखदेव बनकर यांनी कडक भूमिका घेतली आहे. पाच वर्षांपर्यंतच पदाधिकाऱ्यांना स्वीय सहायक ठेवता येतात, त्यानंतर त्यांच्या अन्यत्र बदल्या कराव्यात, असा शासन निर्णयच असल्याने त्यानुसार कार्यवाही करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. काही पदाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक तांत्रिकदृष्ट्याही स्वीय सहायकपदी पात्र नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनीही स्वीय सहायक बदलण्याचा मुद्दा सुखदेव बनकर यांच्याशी बोलताना लावून धरला आहे.(प्रतिनिधी)